Home /News /maharashtra /

पेट्रोल पंपावरच ट्रकची टाकी फुटली, पुढे काय घडलं? पाहा हा VIDEO

पेट्रोल पंपावरच ट्रकची टाकी फुटली, पुढे काय घडलं? पाहा हा VIDEO

यावेळी पेट्रोल पंपावर होती कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता हा आगीने धुमसणारा ट्रक मोठ्या शर्थीने विझवला

  हरीष दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 06 मार्च : अहमदनगर जिल्हयातील कोल्हार भगवती येथे पेट्रोल पंपावरच ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. नागरिक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावत ट्रकची आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. राहाता तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील कोल्हार भगवती गावात ही घटना घडली. शिर्डीरोडवर असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपावर हा मालट्रक डिझेल भरण्यासाठी आला होता. पंपावर येवून थांबलेला असतानाच ट्रकचा टायर फुटला आणी त्याचवेळी गाडीची डिझेल टाकी फुटली त्यामुळे गाडीने पेट घेतला. यावेळी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी जमा झाली होती. प्रसंगधान दाखवत कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता हा आगीने धुमसणारा ट्रक मोठ्या शर्थीने विझवला. अग्निशमन बंब पोहचण्याच्या अगोदरच लोकांनी मानवी साखळी करून गाडीवर पाण्याचा मारा केला. यामुळे धुमसणारी आग आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली आहे. या पंपाच्या शेजारीच दुसरा पेट्रोल पंप आहे जर पेट्रोल पंपाला आग लागली असती तर मोठी हानी झाली असती. वेळीच नागरिकांनी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमध्ये असणारी साखरही काही प्रमाणात जळून खाक झाली. हॉटेलमध्ये घुसून ताटासह तरुणाला बाहेर खेचत आणले, तलवारीने केले सपासप वार दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर हॉटेलमध्ये घुसून तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी देहूरोड तसंच निगडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या ६ तासांत आरोपींना जेरबंद केले आहे. हल्लेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेला प्रशांत भालेकर मित्रांसह विकास नगर किवळे इथं मिसळ खाण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी संधी साधत मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ, डॅनी तांदळे यांच्यासह इतर दोन साथीदार हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर या चोघांनी दोघांना हॉटेलमधून बाहेर खेचत आणलं. बाहेर आणल्यानंतर दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एका जणाने प्रशांत भालेकरवर तलवारीने वार केले. या चौघांनीही लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दोघांनाही गंभीर जखमी केलं. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चौघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये संपूर्ण घटना कैद झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मदत मिळाली. त्यानंतर निगडी तसंच देहूरोड या दोन पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईमध्ये पोलिसांनी ६ तासांमध्ये ४ आरोपीन जेरबंद केले आहे. हल्लेखोरांवर आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करत आहेत. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ, रोण्या फजगे आणि आदित्य कोटगीसह अन्य एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Shirdi

  पुढील बातम्या