मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रवी राणांनी डफली वाजवली, नवनीत यांनी धरला ठेका, पाहा हा VIDEO

रवी राणांनी डफली वाजवली, नवनीत यांनी धरला ठेका, पाहा हा VIDEO

होळी सनानिमित्याने नवनीत राणा  आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते.

होळी सनानिमित्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते.

होळी सनानिमित्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते.

मेळघाट, 10 मार्च :  दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पर्वावर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पाच दिवस मेळघाटातील अनेक गावात जाऊन आदिवासींना होळीच्या शुभेच्छा देऊन होळी साजरी करत असतात. यावेळी  नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत खास ठेका धरला. होळी सनानिमित्याने नवनीत राणा  आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते. आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात रवी राणा यांनी डफली वाजवली तर खासदार नवनीत राणा स्वतः नृत्यात तल्लीन झाल्या. आदिवासींच्या गावात जाऊन आदिवासी भगिनीसोबत मुक्काम करणे, त्यांच्या सोबत जेवण करणे आणि त्यांच्या सोबत वावरणे हे खासदार नसताना आणि आज खासदार असताना सुद्धा खासदार नवनीत राणा करत आहे. नांदगावात धुंड साजरी करण्याची परंपरा दरम्यान, नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या तांड्यावर बंजारा समाजाने वर्षभरात जन्मलेल्या मुलांचे नामकरण करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने धुंड उत्सव केला साजरा केला. होळी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी धुळवड वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बंजारा समाजाचा लोकप्रिय उत्सव म्हणजे होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा धुंडीचा उत्सव या दिवशी बंजारा समाजात जन्मलेल्या लहान मुलाचे नामकरण म्हणजे बारशाचा कार्यक्रम साजरा केला जातो. नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे तांडे असून आज सर्वच तांड्यावर पारंपारिक पद्धतीने धुंड उत्सव साजरा करण्यात आला. नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे, न्यायडोंगरी, माळेगाव यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे होळी नंतर धुळीवंदनला हा समाज आपली शेकडो वर्षाची जुनी परंपरा असलेला धुंड उत्सव साजरा करतो. आज ही या भागात सर्वच तांड्यावर धुंड उत्सव साजरा करण्यात आला. वर्षभरात ज्या मुलांचा जन्म झाला, त्यांचे नामकरण आज केले जाते. ज्या घरात मुलाच नामकरण असते. त्या घरातील आजी, किंवा आईच्या मांडीवर लहान मुलाला पांढरा पोशाख घालून बसवले जाते आणि त्यांच्या डोक्यावर लाकूड आडवे धरुन अन्य नातेवाईक त्यावर काठ्या मारुन गाणी म्हणतात. बंजारा भाषेत त्याला आशीर्वाद दिल्या सारखे मानतात. यावेळी वाद्याच्या तालावर बंजारा महिला लेंगी नृत्य सादर करतात. त्यानंतर सुरू होतो तो मुख्य धुंडीचा कार्यक्रम यात मोकळ्या जागेत दोन खुंट रोवले जातात. त्यामध्ये एक हुंडा ठेवलेला असतो. ज्यात गुळाची लापशी पुऱ्या असे पदार्थ ठेवून तो त्या खुंटाला बांधून ठेवतात. पुरुष मंडळी खुंटातून हंडा सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. तेव्हा महिला त्यांना काठीने मारतात. हा खेळ फक्त दीर व भावजयी खेळतात. एकूणच बंजारा समाजात साजरा होणार होळीचा सण एक दिवस अगोदर साजरा होत असला तरी धुळवडीच्या दिवशी साजरा होणाऱ्या धुंडीला मात्र विशेष महत्व असतं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Amravati, Navneet rana, Ravi rana, Video

पुढील बातम्या