Home /News /maharashtra /

किती राहिली रे, मालगाडी अंगावरून जातानाही आजीबाई होत्या विचारत, पाहा हा VIDEO

किती राहिली रे, मालगाडी अंगावरून जातानाही आजीबाई होत्या विचारत, पाहा हा VIDEO

मालगाडी आजीबाईंच्या अंगावर जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई, 03 मार्च : रेल्वे रूळ ओलांडू नका, त्यामुळे तुमच्या जिवाला धोका आहे, अशी सुचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते. पण, देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रयत्न नुकताच समोर आला आहे. एक आजीबाई रेल्वे रूळ ओलांडत असताना मालगाडी खाल्या सापडल्या पण यातून त्या अगदी सुखरूप वाचल्या. मालगाडी आजीबाईंच्या अंगावर जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ लोणावळ्यातील आहे असं म्हटलं जातंय. पण नेमकं कुठे घडलंय याची खात्रीशीर माहिती मिळु शकली नाही. पण झालं असं की, एका स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीच्या खालून एक आजी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. नेमकं त्याचवेळी मालगाडी सुरू झाली मग आजी आत अडकल्या आणि खूप घाबरल्या. पण आजूबाजूला असणाऱ्या प्रवाशांनी आजीबाईंना रुळावर सरळ झोपायला सांगितलं. आणि मालगाडी जाईपर्यंत अजिबात हलू नका अशी सतत काळजीवजा सुचना करू लागले. ज्या क्षणी आजी उठतील असं वाटलं त्या क्षणी थांबा आता गाडी संपले असंही काळजीवजा तंबी लोक द्याला विसरे नाहीत. ज्या व्यक्तीनं आजींना हे समजावलं त्या व्यक्तीनं आजींचा व्हिडिओ काढायला विसरला नाही. थोडक्यात काय आजींच दैव बलवत्तर. पण सगळ्याच लोकांच असेल असं नाही. त्यामुळे उशीर झाला तरी चालेल. गुडघ्यांना थोडा त्रास झाला तरीही चालवून घ्या. पण रेल्वे पुलांचा वापर करा आणि असा जीवघेणा शॉर्टकट जर अजिबात वापरू नका. चल, पोलीस चौकीला मीही सांगतो, 12वीच्या विद्यार्थ्याने पकडली कंडक्टरची कॉलर; VIDEO व्हायरल राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून समजल्या जाणाऱ्या पुण्यात काय उणे घडले याचा नेम नाही. एकीकडे शिक्षणाचं माहेर घरं नावलौकिक असलेल्या पुण्यात एका विद्यार्थ्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला. धावत्या पीएमटी बसमध्ये 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वाहकाला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मागील शनिवारी आळंदी ते स्वारगेट बसमध्ये हा प्रकार घडला होता. पीएमटी बसमध्ये चालकाच्या बाजूने येण्यास मनाई असते. मागील दाराने बसमध्ये प्रवेश करण्याचा नियम आहे. परंतु, हा मुलगा बसच्या समोरच्या दारातून चढला. वाहकाने त्याला हटकले असता तो त्यांच्याशीच वाद घालायला लागला. हा वाद इतक विकोपाला गेला की, त्याने थेट वाहकाची कॉलर पकडून धरली आणि शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी या मुलांची समजूत काढली पण त्याने त्यांचं काही ऐकलं नाही. अखेर चालकाने पोलीस स्टेशनला बस नेण्याचा निर्णय घेतला. तरीही या मुलाने वाहकाची कॉलर धरून ठेवत बसमध्ये राडा घातला. अखेर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं. घडलेल्या प्रकाराबद्दल त्याच्या नातेवाईकांनी पीएमटीच्या वाहक आणि चालकाची माफी मागितली. या मुलाची 12 वीची परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याची समजूत काढून सोडून दिलं. परंतु, पुण्यातील पीएमटी बस मधला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Social media, Viral, Viral photos

पुढील बातम्या