...आता बायकोच हाकलून देईल, अजितदादांची तुफान फटकेबाजी, पाहा हा VIDEO

...आता बायकोच हाकलून देईल, अजितदादांची तुफान फटकेबाजी, पाहा हा VIDEO

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी बंगला मिळत नसल्यामुळे खंत व्यक्त करत तुफान फटकेबाजी केली आहे

  • Share this:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 14 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी बंगला मिळत नसल्यामुळे खंत व्यक्त करत तुफान फटकेबाजी केली आहे. 'मुंबईतलं घर लहान आहे. १०० दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक', अशा शब्दांत अजित पवार यांनी शासकीय निवासस्थान रिकामं होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शासकीय घराबद्दल आपली खंत व्यक्त केली. अनेकदा बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरूममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचं राहिलंय, आता हे झालं तर बायकोच मला घराबाहेर हाकलून देईल, असं म्हणताच एकच हश्या पिकली.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटिंगवर निवडून येणाऱ्या संचालकाचं जागेवर राजीनामा घेऊ, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी निवडणुकीदरम्यान काहीजण गंमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं.. अन्यथा आपण गंमतीजमती सुरू केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

रोहित पवारांनी 'Happy Valentines Day' म्हणत लगावला टोला

रोहित पवारांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत एक हटके ट्वीट केलं आहे ज्याची चांगलीच राजकीय चर्चा सुरू आहे. 'हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे' असं म्हणत त्यांनी ट्वीटची सुरुवात केली पण त्यानंतर असं केंद्र सरकारला चांगलाच टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

आजच्या प्रेमाच्या दिवशी सगळेजण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या गोष्टी करतं. पण तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झाला आहे असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

काय लिहलं आहे ट्वीटमध्ये...

'हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.'

खरंतर गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.

First published: February 14, 2020, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading