बारामतीत आलिशान BMW कार पेटली, फळ विक्रेत्याने वाचवला दोघांचा जीव VIDEO

'वेळ आली होती मात्र, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो फळविक्रेत्याच्या रूपाने देव आमच्यासाठी धावून आला,

'वेळ आली होती मात्र, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो फळविक्रेत्याच्या रूपाने देव आमच्यासाठी धावून आला,

  • Share this:
 बारामती,  15 मार्च :  इंदापूर  रस्त्यावर एका बीएमडब्यू या आलिशान गाडीने अचानक  पेट घेतला. फळविक्रेत्याच्या समयसुचक तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. बारामती येथील विशाल मदने राहण काटी ( ता. इंदापुर ) येथील नातेवाईक यांची भेट घेऊन बारामतीकडे निघाले होते. मदने BMW  या आलिशान गाडीतून चालकासह तिघेजण प्रवास करत होते. भवानीनगर इथं छत्रपती कारखान्याच्या प्रशासन इमारतीसमोर  फळं घेण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी फळविक्रेता मनोज ठेगंले यांनी गाडीतून धूर निघत आहे. 'तातडीने गाडीतून उतरा गाडीने पेट घेतला', असं जोर- जोरात ओरडले. मदने हे फळं घेण्यासाठी उतरले होते उर्वरित दोघे जण गाडीतच होते, गाडी पेटली आहे समजताच दोघे जण गाडीतून खाली उतरले. पुढच्या बाजूने गाडी पूर्ण पेटलेली होती. वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला. रस्त्यावर गाडी पेटली ही बातमी नजीकच हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती कारखान्यात समजली. तातडीने कारखान्याचा अग्निशमन गाडी येऊन  गाडी विझवली आणि मोठा अनर्थ ठळला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडी पेटलेली परिसरात समजतात बघ्यांची मोठी गर्दी झाली यावेळी गाडी पूर्णपणे पुढच्या साईटने जळालेली आहे. फळ विक्रेत्यांनी दाखवलेली तत्परतेनं मदने परिवाराला तारले. 'वेळ आली होती मात्र, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो फळविक्रेत्याच्या रूपाने देव आमच्यासाठी धावून आला,' असं डी.एम. मदने यांनी सांगितलं. चुकून स्पीड वाढला आणि तरुणीकडून घडला भयंकर स्टंट सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जातात. त्यात अनेकदा गंमतीदार घटना कैद होतात. आता एका मुलीने घराच्या गेटवर गाडी चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजलेलं नसलं तरी अपघाताने गाडीचं स्पीड वाढून स्कूटी स्पीडने पुढे जात असल्याचं यात दिसतं. याआधी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तरुणी मंदिराच्या दारात स्कुटी घेऊन उभा दिसते. ती स्कूटी स्टार्ट करताच स्पीड अचानक वाढून थेट मंदिरातच गाडी शिरल्याचं दिसतं. अशाच पद्धतीनं दुसऱ्या व्हिडिओमध्ये गेटसमोर असलेली गाडी सुरू करताच स्पीडने पुढे गेली. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे माहिती नसल्यानं याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंच असं अचानक स्पीड वाढू शकतं. स्कूटीमध्ये गिअर सिस्टीम नसल्यानं त्यावर नियंत्रण मिळवणं कठिण असतं. काही कळण्याच्या आतच अनावधानाने स्पीड वाढल्यास अपघाताला निमंत्रण मिळते.
First published: