सांगली, 5 जून: राज्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यात दरम्यान राज्यातील विविध भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस (heavy rainfall) कोसळत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा (Shirala, Sangli) येथेही आज दुपारच्या समारास सोसाट्याच्या वाऱ्यासह (strong winds) पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शिराळा एमआयडीसीतील अनेक कारखान्यांचे पत्रेच उडून गेले. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे.
सांगलीच्या शिराळा येथे वादळी वाऱ्याने एम.आय.डी.सी. मधील अनेक कारखान्याचे पत्रे उडून गेले आहेत. हे पत्रे उडतानाचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहेत. यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी पावसाला सुरवात झाली आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) June 5, 2021
Monsoon Update: खूशखबर! वेळेआधीच वरुणराजा राज्यात दाखल; मुंबई, पुण्यात कधी पोहोचणार?
पाच जण जखमी
या वादळीवाऱ्यात पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये शिराळ्यातील नुतन महादेव डांगे वय 23 या युवतीच्या पायवर भिंत पडल्याने दोन्ही पाय मोडले आहे. तर डोक्याला मार लागला आहे. भिंत पडल्याने शाहूवाडीत मेघा लक्ष्मण पाटील गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला मार लागला आहे. वादळात इकोराईजबायोफर्टीलायझर कंपनीची भिंत पडली आणि छत उडाले. यामध्ये काम करणाऱ्या तीन मुली आणि एक महिला जखमी झाले आहेत.
सांगलीच्या शिराळा येथे वादळी वाऱ्याने एम.आय.डी.सी. आणि भटवाडी गावाला फटका बसला आहे. या ठिकाणच्या अनेक कारखान्याचे पत्रे उडून गेले आहेत. तर भटवाडीमधील घरचे पत्रे आणि घरं पडली आहेत. त्यामुळे संसार उपयोगी वस्तू आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती कळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.