मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'या' जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, तिन्ही पक्ष निवडणुकीत आमनेसामने

'या' जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, तिन्ही पक्ष निवडणुकीत आमनेसामने

मात्र, ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ह्या जागा रिक्त झाल्यात. त्यामुळं या सर्व जागांसाठी 19 जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे.

मात्र, ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ह्या जागा रिक्त झाल्यात. त्यामुळं या सर्व जागांसाठी 19 जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे.

मात्र, ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ह्या जागा रिक्त झाल्यात. त्यामुळं या सर्व जागांसाठी 19 जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे.

किशोर गोमासे, प्रतिनिधी

वाशिम, 06 जुलै : वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत  (Washim Zilla Parishad election) महाविकास आघाडीतील (mva goverment) घटक पक्षांच्या उमेदवारांना एकत्र लढण्याच्या प्रयत्नांमध्ये काही जागांचा अडसर ठरत असल्याने स्थानिक नेत्यांच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीत आघाडी करण्याचा कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,भाजप आणि वंचित व जनविकास आघाडीची युती असल्याने ही लढत पंचरंगी होणार आहे.

आज या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी 107 उमेदवाराचे 123 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितींच्या 27 जागांसाठी 180 उमेदवाराचे 197 अर्ज दाखल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी आरक्षण होत असल्याच्या दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण रद्द केल्यानं ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 6 पंचायत समित्यांच्या 27 गणांसाठी 19 जुलै रोजी मतदान होत आहे.

राशीभविष्य: 'या' राशींसाठी दिवस असणार मध्यम; पाहा काय आहे तुमची आजची ग्रहस्थिती

वाशिम जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद होते. पोट निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या 14 गटातून वंचित बहूजन आघाडीचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, भाजप 2, जनविकास आघाडी 2 आणि काँग्रेस, शिवसेनेचा प्रत्येकी 1 असे व अपक्ष 1 सदस्य निवडूण आले होते.

मात्र, ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ह्या जागा रिक्त झाल्यात. त्यामुळं या सर्व जागांसाठी 19 जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत केवळ वंचित व माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीची युती झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये जागांवरून मतभेद झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत असल्यामुळं ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता दिसत आहे.

अधिवेशनाचा दुसरा दिवस; ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप?

ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी वाशिम जिल्हा परिषदेमध्ये एकूण असलेल्या 52 सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12, काँग्रेस 10, वंचित 8, भाजपा 7, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी 7, शिवसेना 6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने इतर मागास प्रवर्गाच्या 14 जागा रिक्त झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या चार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजप व जनविकास आघाडीच्या प्रत्येकी दोन, काँग्रेस व शिवसेना आणि अपक्षाची प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतं आहे.

First published:
top videos