• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'Sorry Friends...' व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत 19 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

'Sorry Friends...' व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत 19 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

'सॉरी फ्रेंड्स' असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून ऋषिकेश जाधवने गळफास (young man committed suicide after posting WhatsApp status) घेतला.

  • Share this:
वाशिम, 21 मार्च : वाशिम जिल्ह्यातील (Washim District) शिरपूर जैन येथील ऋषिकेश अंबादास जाधव या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 'सॉरी फ्रेंड्स' असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून ऋषिकेश जाधवने गळफास (young man committed suicide after posting WhatsApp status) घेतला. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून मित्रही सुन्न झाले आहेत. शिरपूर जैन येथील मालेगांव महामार्गालगत वास्तव्यास असलेल्या जाधव कुटुंबातील 19 वर्षीय ऋषिकेश हा डिसेंबर 2020 पासून वाशिमच्या रुग्णालयात कॉन्ट्रॅक्ट बेसवर वार्ड बॉय म्हणून कार्यरत होता. शुक्रवार 19 मार्च रोजी तो ड्युटी करून आपल्या गावी शिरपूर येथे परतला होता. शनिवार 20 मार्च रोजी तो दिवसभर घरी होता. शनिवारी रात्री ऋषिकेशने कुटुंबीयांसोबत जेवणही केले. तोपर्यंत सर्व सुरळीत होते. कुटुंबातील सर्वजण रात्री झोपले. दोन दिवसापासून परिसरात पावसाचे वातावरण असल्याने ऋषिकेशचे वडील अंबादास जाधव हे रविवारी मॉर्निंग वाकला जाऊ शकले नाही. त्यामुळे ते घराच्या गच्चीवर मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असताना त्यांना जिन्यामध्ये ऋषिकेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. ऋषिकेशने व्हॉट्सअ‍ॅपवर नेमकं काय स्टेटस ठेवलं? ऋषिकेशने शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी रात्री साडेनऊ वाजता त्याने आपल्या मोबाईलमध्ये सॉरी फ्रेंड्स असं स्टेटस ठेवलं होतं. हेही वाचा - धक्कादायक! आजीनं तंबाखूचं सेवन करण्यास केली मनाई, नऊ वर्षाच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथे पाठवला. ऋषिकेश जाधवने सॉरी फ्रेंड्स असं स्टेटस ठेवून गळफास लावून आत्महत्या केल्यानं त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून मित्रांच्या दुःखाची परिसीमा उरली नाही. सर्व मित्र आणि कुटुंबातील लाडका आणि मितभाषी असलेल्या ऋषिकेशच्या आत्महत्येनं सर्व जण सुन्न झाले आहेत. लक्ष्मी आणि अंबादास जाधव यांना दोन मुले असून ऋषिकेश हा धाकटा मुलगा आहे, तर अभिषेक हा थोरला मुलगा आहे. ऋषिकेशचे काका देविदास जाधव यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले, आजी, आजोबा असे एकत्रित कुटुंब आहे. शिरपूर परिसरात जाधव कुटुंबातील एकोपा सर्वांसाठी आदर्श आहे.
Published by:Akshay Shitole
First published: