भीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

भीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

दुचाकीस्वार महिला रोडरोलरच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज घडली.

  • Share this:

वाशिम, 17 जानेवारी : वाशिम शहरातील पूसद नाक्यावर एक दुचाकीस्वार महिला रोडरोलरच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज घडली. छाया अशोक परघणे ( वय 45 ) असं मृत महिलेचं नाव आहे.

सदर महिला आपली स्कुटी घेऊन पुसद नाक्यावरून येत असताना खड्डयातून स्कुटी आदळली गेली आणि तोल जाऊन ती महिला रस्त्यावर खाली पडली आणि रोड रोलरच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. यामध्ये घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. अकोला - नांदेड महामार्ग ही दुर्घटना झाली. या घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या अकोला - नांदेड महामार्गावर प्रचंड खड्डे झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. तसंच अपघात होऊन अनेक निरपराधांचा जीवही जात आहे. त्यामुळे याला अपघात म्हणायचं की व्यवस्थेकडून घेतले जाणारे बळी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

अपघाताच्या या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येऊन या महामार्गावरील खड्डे बुजवले जाणार का, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: January 17, 2021, 11:36 PM IST

ताज्या बातम्या