सरकारी बाबूंच्या भूमिकेमुळे अख्खं गाव कर्जबाजारी !

सरकारी बाबूंच्या भूमिकेमुळे अख्खं गाव कर्जबाजारी !

सरकार सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कोट्यवधी रुपयांचं अनुदान देतंय. पण हे अनुदान सरकारी बाबू शेतकऱ्यांपर्यंत पोहचूच देत नाहीत

  • Share this:

मनोज जैसस्वाल, वाशिम

06 मे : सरकार सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कोट्यवधी रुपयांचं अनुदान देतंय. पण हे अनुदान सरकारी बाबू शेतकऱ्यांपर्यंत पोहचूच देत नाहीत. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव कर्जबाजारी झालंय.

वाशिम जिल्ह्यातल्या कंझारा गावातल्या या विहिरी... काही विहिरींचं बांधकाम पूर्ण झालंय. तर काहींचं अपूर्ण आहे. या सगळ्या विहिरी पाण्यानं भरल्यात. पण शेतकरी मात्र कर्जबाजारी आहेत. कारण या गावातल्या बावीस शेतकऱ्यांचं शासकीय अनुदान ग्रामपंचायत आणि पंचायत समिती पातळीवर अडवून ठेवलंत. शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी कर्जाच्या बोजाखाली आहे.

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवतं. पण या योजना चिरिमिरीच्या लालसेत अधिकारी आणि सरकारी बाबू शेतकऱ्यांपर्यंत पोहचूच देत नाहीत. त्यामुळे अशा झारीतल्या शुक्राचार्यांवर कारवाईची मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 04:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading