मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्नसोहळा जवळ आला आणि घराला लागली भीषण आग, बापाने मुलीसाठी जमवलेलं सगळं जळून खाक!

लग्नसोहळा जवळ आला आणि घराला लागली भीषण आग, बापाने मुलीसाठी जमवलेलं सगळं जळून खाक!

Washim Fire : संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे आंदण व इतर साहित्य जळाल्यानं अल्प भूधारक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

Washim Fire : संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे आंदण व इतर साहित्य जळाल्यानं अल्प भूधारक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

Washim Fire : संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे आंदण व इतर साहित्य जळाल्यानं अल्प भूधारक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

वाशिम, 13 मार्च : वाशिम जिल्ह्याच्या (Washim District) मंगरुळपिर तालुक्यातील पारवा इथं शुक्रवारी मध्यरात्री आग (Fire) लागून घरातील संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे आंदण व इतर साहित्य जळाल्यानं अल्प भूधारक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

पारवा येथील बाळू तुकाराम मस्के आणि ज्ञानेश्वर तुकाराम मस्के या दोन भावंडांच्या घराला मध्यरात्री आग लागली त्यामध्ये घरातील सर्व साहित्य जळाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे. घरामध्ये लग्न सोहळा ऐन तोंडावर आला असताना अशी दुर्घटना घडल्यानं मस्के कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे.

दोन्ही भावांचे कुटुंब घरातील आतल्या खोलीत झोपलेले असल्यानं आग लागल्यावर ग्रामस्थांनी सर्वात अगोदर या कुटुंबाला खोली बाहेर सुरक्षित काढल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये घरातील संसारपयोगी साहित्य, तसंच बाळू मस्के यांच्या अर्चना नामक मुलीचे लग्न मंगळवार 16 मार्च रोजी असल्यामुळे घरात लग्न उपयोगी साहित्य आणि आंदण आणलेले होते. आगीत ते देखील जळून खाक झाले.

हेही वाचा - बारामतीत शेतकऱ्याच्या मुलाचं 'फिल्मी स्टाईल' अपहरण, वडिलांना फोन करून थेट 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

याच घरात मोटरसायकल, शेती उपयोगी साहित्य, तूर, गहू आणि हरभरा हे धान्यही जळाले. अगोदरच संकटात असलेल्या या शेतकऱ्यांवर रात्रीच्या आगीच्या दुर्घटनेमुळं मोठं संकट कोसळलं आहे.

घरामध्ये मुलीचे लग्न असल्याने मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून खरेदी केलेले लग्नउपयोगी साहित्य तसंच तिला द्यावयाचे आंदण ही आगीने आपल्या कवेत घेतल्यानं बाळू मस्के यांच्या वधू मुलीसह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आगीमध्ये या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्यानं त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. ऐन तोंडावर घरचं लग्न असताना ही आगीची घटना घडल्यानं बाळू मस्के यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देण्याची गरज आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या दुर्घटनेच्या पंचनाम्यानंतर शासकीय स्तरावरून नुकसान भरपाईसह आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. मंगरुळपिर पोलीस आगीच्या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Fire, Washim, WASHIM NEWS