मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /परवानगी नसातानाही ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरोधात FIR दाखल

परवानगी नसातानाही ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरोधात FIR दाखल

कारंजा येथील रियाज अहमद गुलाम रसूल याच्या मालकीच्या मे. हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 64 ऑक्सिजन चे सिलेंडर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून जप्त केले होते.

कारंजा येथील रियाज अहमद गुलाम रसूल याच्या मालकीच्या मे. हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 64 ऑक्सिजन चे सिलेंडर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून जप्त केले होते.

कारंजा येथील रियाज अहमद गुलाम रसूल याच्या मालकीच्या मे. हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 64 ऑक्सिजन चे सिलेंडर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून जप्त केले होते.

वाशिम, 14 मे: वाशिम जिल्ह्यातील (Washim District) कारंजा येथील मे. हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 55 भरलेले आणि 9 रिकामे असे एकूण 64 ऑक्सिजनचे सिलेंडर (Oxygen Cylinder) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 26 एप्रिल रोजी जप्त केले होते. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक (FDA Inspector) हेमंत मेतकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये 12 मे रोजी एफआयआर दाखल केला आहे.

कारंजा येथील रियाज अहमद गुलाम रसूल याच्या मालकीच्या मे. हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 64 ऑक्सिजन चे सिलेंडर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून जप्त केले होते. सदर दुकानाला औषध परवाना नसतानाही ऑक्सिजन सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. सदर ऑक्सिजन सिलेंडर कारंजा येथील जवाहर हॉस्पिटल यांच्या नावाने नागपूर येथील मे. अमोहा ऑक्सी इंडस्ट्रीयल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून भरून आणल्याचे उघड झाले आहे.

जवाहर हॉस्पिटलचे डॉ. विजय जवाहर मालानी यांनी सदर ऑक्सिजन सिलेंडर भरून आणण्याची ऑर्डर दिली नसल्याचे तसेच त्याचे पेमेंट ही केले नसल्याचे आणि त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज नसल्याचे त्यांनी जबाबात सांगितले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 10 एप्रिल 2021 च्या अधिसूचनेनुसार राज्यात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रसार पाहता ऑक्सिजनचा वापर फक्त वैद्यकीय कारणासाठी करण्याचे निर्देश आहेत. मात्र जवाहर हॉस्पिटल यांची कोणतीही मागणी नसताना रियाज अहमद गुलाम रसुल हा विनापरवाना, अवैधरित्या इतर प्रयोजनार्थ वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर करीत असल्याने त्याच्या विरुद्ध व सर्व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी हेमंत मेतकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे 12 मे रोजी एफआयआर दाखल केला.

वाचा: कोरोना संकटात रुग्णालयाकडून लूट आणि उपचारात हलगर्जीपणा भोवला; रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल

सदर प्रकरणी पोलिसांनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 क शिक्षा कलम 27, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7, साथीचा रोग कायदा 1897 चे कलम 2, 3 व 4, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे अवैधरित्या ऑक्सिजन सिलिंडर बाळगणाऱ्यांमध्ये भीती पसरली असून कुणीही ऑक्सिजन सिलिंडरचा गैरवापर करू नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply, Washim