मालकावरील वार स्वत:वर झेलला; बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार, शेतकरी गंभीर

मालकावरील वार स्वत:वर झेलला; बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार, शेतकरी गंभीर

शेतकरी मालकाला वाचवण्यासाठी कुत्राने बिबट्यावर हल्ला चढवला, पण...

  • Share this:

वाशिम, 20 जानेवारी : वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातील रोहना शेत शिवारात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांच्या सोबतीला असणारा एक कुत्रा ठार झाला आहे.

रोहना इथं सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानं सुखदेव शिंदे ( वय 55 ) हे शेतकरी गंभीर जखमी झाले. सुखदेव शिंदे हे आपल्या शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरता गेले असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सुखदेव शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

शेतकऱ्यावर हल्ला झाल्यानंतर बिबट्यावर धावून गेलेल्या कुत्र्याला बिबट्याने ठार केले. कुत्रा बिबट्यावर धावल्याने बिबट्याने शिंदे यांना सोडून कुत्र्यावर चढवला. कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव गमावला आहे.गंभीर जखमी सुखदेव शिंदे यांच्यावर उपचार सुरू असून रोहणा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांकडून शेतकऱ्यांवर होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यांचा प्रशासनाने ताबोडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 20, 2021, 7:42 AM IST

ताज्या बातम्या