वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा, लाखो रुपयांच्या निधीची घोषणा

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा, लाखो रुपयांच्या निधीची घोषणा

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.

  • Share this:

वाशिम, 20 डिसेंबर : वाशिम जिल्ह्यात एकूण 163 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारी 2021 रोजी होऊ घातली असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.

ग्राम पंचायत बिनविरोध स्थापन करणाऱ्या गावाला लाखोंचा विकास निधी देण्याच्या घोषणा लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. यामध्ये रिसोड विधानसभेचे काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदारसंघातील जी ग्रामपंचायत बिनविरोध स्थापन होईल त्या गावांना 21 लाखाचा विकास निधी देण्याचे जाहीर करताच कारंजा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनीही 11 लाख रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले.

दुसरीकडे, आता चक्क तिवळी जिल्हापरिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या बेबीताई इंगोले यांच्या गटामधील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला 10 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांचे पुत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांनी केल्याने जिल्ह्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये जणू काही स्पर्धा लागल्याचं दिसत आहे. मात्र असं असलं तरी जिल्ह्यातील गावपुढारी खरंच आपल्या गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधिंच्या या घोषणेला साद देतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 20, 2020, 10:40 PM IST

ताज्या बातम्या