Home /News /maharashtra /

वाशिममध्ये भीषण अपघात, शेतामधून घरी परतत असणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

वाशिममध्ये भीषण अपघात, शेतामधून घरी परतत असणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

मोटरसायकलस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळ दरम्यान घडली.

वाशिम, 19 डिसेंबर : वाशिम शहरानजीक असलेल्या अकोला-नांदेड महामार्गावरील झाकलवाडी परिसरातील रोप वाटिके जवळ भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या जबर धडकेमध्ये मोटरसायकलस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळ दरम्यान घडली. वाशिम येथील सुदामा कड हे 66 वर्षीय शेतकरी आपल्या सावरगांव बर्डे शिवारातील शेतीमधून दुचाकीने घरी परतत होते. त्यावेळी अकोला-नांदेड महामार्गावरील झाकलवाडी नजीक अज्ञात वाहनाने सुदामा कड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सुदामा कड हे शेतकरी घटनास्थळीच ठार झाले आहेत. हेही वाचा - पोलीस दल हादरलं, घटस्फोटीत महिलेसोबत पोलीस कर्मचाऱ्याने केलं संतापजनक कृत्य अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पाटील हे पसार वाहनाचा शोध घेत असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुदामा कड या शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत अकोला-नांदेड महामार्ग निर्मितीचे काम सुरू असल्यानं महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Road accident, Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या