वाशिम, 4 फेब्रुवारी : वाशिम जिल्ह्यातील नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गावर उमरदरी फाट्याजवळ भरधाव कारने उभ्या असलेल्या प्रवासी ऑटोला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर आग लागून कार जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
उमरदरी फाट्यानजिक प्रवासी ऑटो उभा असताना भरधाव आलेल्या कारने या ऑटोला मागील बाजूने जबर धडक दिली. यामुळे ऑटोमधील एक महिला प्रवासी आणि ऑटो चालक बाहेर फेकला गेला. यात महिला गंभीर जखमी तर ऑटो चालक किरकोळ जखमी झाला.
हेही वाचा - 6 लाखाच्या दागिन्यांची बॅग लोकलमध्ये राहिली, स्टेशनबाहेर आल्यावर महिलेच्या लक्षात आलं आणि...
त्यांनंतर भरधाव कार झाडावर जाऊन आदळल्यानं तिला आग लागून ती खाक झाली. सुदैवाने त्या कार मधील एक महिला आणि एक पुरुष वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली.
या अपघाताची कोणतीही तक्रार पोलिसात करण्यात आली नसून गंभीर जखमी महिलेवर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.