मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाशिममध्ये हायवेवर भीषण अपघात; एक जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी

वाशिममध्ये हायवेवर भीषण अपघात; एक जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी

 या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

वाशिम, 14 डिसेंबर : वाशिम जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील नागरतास इथं कार आणि दुचाकीची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामधील गंभीर जखमींना वाशिम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतक गणेश कहळे हा माळराजुरा येथील असून अवरदरी येथील रघुनाथ आंधळे आणि अमोल कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या या अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही वाहने वेगात असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत. हेही वाचा - मुंबई ATS ची मोठी कारवाई, बनावट दस्तऐवजासह बांगलादेशी नागरिकाला अटक दरम्यान, गेल्या काही काळापासून महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश दुर्घटना या भरधाव वेगामुळे चालकांचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे वाहनचालकांनी वेगाच्या मर्यादेचं पालन करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या