वाशिममध्ये भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेनंतर 2 जणांनी जागीच गमावला जीव

वाशिममध्ये भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेनंतर 2 जणांनी जागीच गमावला जीव

ही घटना 16 सप्टेंबर रोजी अकोला-नांदेड महामार्गावरील तामसाळा फाट्यानजीक घडली.

  • Share this:

वाशिम, 16 सप्टेंबर : कंटेनर आणि मोटरसायकलची जोरादर धडक झाल्याने वाशिम जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना 16 सप्टेंबर रोजी अकोला-नांदेड महामार्गावरील तामसाळा फाट्यानजीक घडली.

या अपघातात देवराव विश्वास खाडे (वय 33 रा. धारकाटा) आणि समाधान किसन राऊत (वय 40, रा. आनंदवाडी अकोला नाका, वाशिम) हे दोघे ( MH 28 BD 3127) या मोटार सायकलने जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (RJ 84 6036) मोटरसायकलला जबरदस्त धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी नंदकुमार सरनाईक यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त कंटेनर जप्त करण्यात आला आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असून वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय शिंपणे यांच्यासह पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, लॉकडाऊन काळात प्रवासाबाबत निर्बंध घालण्यात आल्याने रस्त्यावर तुरळक वाहने दिसत होती. परिणामी राज्यातील अपघातांच्या घटनांमध्ये मोठी घसरण झाली. मात्र अनलॉक सुरू होताच मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर धावू लागली आणि पुन्हा एकदा अपघाताच्या दुर्दैवी घटनांमध्ये वाढ होत आहे.

दरम्यान, वेगावर नियंत्रण नसल्यानेच अपघाताच्या बहुतांश घटना घडतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहन चालवताना शिस्त बाळगण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 17, 2020, 12:03 AM IST

ताज्या बातम्या