मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भरदिवसा हत्या, शहर हादरलं

24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भरदिवसा हत्या, शहर हादरलं

या खुनातील तपासासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

या खुनातील तपासासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

या खुनातील तपासासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

वाशिम, 21 डिसेंबर : वाशिम शहरातील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना आज घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अब्दुल वसीम अब्दुल अजीम ( भवानी नगर,वाशिम वय 24 वर्ष ) असं आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वाशिम शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच या खुनातील तपासासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. या तरुणाची हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली याचा तपास वाशिम शहर पोलीस करीत असून तपासासानंतर या हत्या प्रकरणात सविस्तर खुलासा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - भयंकर! Video Game खेळू न दिल्यानं तरुणानं आपल्या आई-वडिलांना चाकूनं भोकसलं दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाशिम शहरातील वर्दळीचा मानला जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातच ही हत्या झाल्याने शहरात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
First published:

Tags: Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या