वाशिम, 19 मे : कोवळ्या ज्वारीचे फुटवे खाल्याने विषबाधा (Poison) होऊन 12 गायींचा मृत्यू (12 cow died) झाला असून 30 ते 40 गायींवर उपचार सुरू आहेत. या अगोदरही 10 मे रोजी मानोरा तालुक्यातील (Manora Tehsil Washim) भुली शेत शिवारात 10 गायींचा ज्वारीची कोवळी पाने खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील गुराखी जनावरांचा कळप चारत असतांना बाळू अशोकराव देशमुख यांचे शेतातील कोवळ्या ज्वारीमध्ये 50 हून अधिक गायी त्या शेतात शिरल्या. या गायींनी कोवळ्या ज्वारीची फुटवे खाल्ल्यानं 12 गायींचा जागीच मृत्यू झाला तर 40 हून अधिक गायींवर खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी शासकीय पशु संवर्धन अधिकारी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे गायींवर उपचारासाठी उशीर झाल्यानं 10 गायींचा मृत्यू झाल्याचं गोपालकांनी सांगितलं आहे. उन्हाळ्यातील चारा टंचाईमुळे जनावरे थोड्या फार प्रमाणात दिसेल ती हिरवी पाने खाण्यासाठी शेताकडे वळतात. आज मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील सुरेश गणपत चव्हाण हे गुराखी आपला जनावरांचा कळप चराई करीता शेतात नेत असताना 12 वाजताचे दरम्यान बाळू देशमुख यांच्या शेतात घुसून ज्वारीचे फुटवे खाल्ले आहेत.
शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत; गावातील 10 गायींचा मृत्यू, तर 30 हून अधिक बेपत्ता
या कोवळ्या फुटव्यात मोठ्या प्रमाणात हायड्रोजन सायनाईट हा विषारी घटक असल्यामुळे जनावरांना विषबाधा होऊन यात सुभाष देवीसिंग चव्हाण यांच्या 2, सुरेश गणपत चव्हाण यांच्या 4, दिलिप किलसिंग राठोड यांच्या 2, अंबादास चव्हाण यांच्या एका गाईचा जागीच मृत्यू झाला. तर 40 पेक्षा जास्त गायींना विषबाधा झाल्याने त्या गायीवर खाजगी डॉक्टर कडून उपचार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात गायींना विषबाधा झाली असताना वेळेवर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी येऊ न शकल्यामुळे विषबाधा होऊन 12 गायींचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाला.
काही गोपालक आपली जनावरं वाचावी यासाठी झाड पाल्याचा अर्क पाजत होते मात्र काही उपयोग होत नसल्याने घटनास्थळी गोपालकांचा मोठा आक्रोश होता. सुरेश चव्हाण या गोपालकाच्या चार गाई चराई साठी गेल्या होत्या, त्यातील चार ही गायी दगावल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे सह इतर गोपालकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील परेश राठोड यांच्यासह सरपंच नंदाताई शेलकर आणि उपसरपंच श्रावण कांबळे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Washim