मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''ती एक चूक होती, पण पश्चाताप होत नाही'', 'त्या' शपथविधीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

''ती एक चूक होती, पण पश्चाताप होत नाही'', 'त्या' शपथविधीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधी (sworn) सोहळा चांगलाच (surprise ceremony) गाजला होता.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधी (sworn) सोहळा चांगलाच (surprise ceremony) गाजला होता.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधी (sworn) सोहळा चांगलाच (surprise ceremony) गाजला होता.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 06 जून: 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधी (sworn) सोहळा चांगलाच (surprise ceremony) गाजला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 80 तासांच्या सरकारची आजही चर्चा होते. या शपथविधीवर तब्बल दीड वर्षांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on sworn surprise ceremony) यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतलेली शपथ ही एक चूकच होती, पण त्यांचा पश्चाताप नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Was mistake but no regrets 2019 Devendra Fadnavis on sworn surprise ceremony with ajit pawar) अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे शपथ घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हा चुकीचा होता. पण त्याचा आता पश्चाताप होत नाही, असं म्हणत फडणवीस यांनी ज्यावेळी पाठीत खंजीर खुपसला जातो. तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं आणि तुम्ही राजकारणात मेलात तर तुम्हाला उत्तर देणं शक्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 2019 ला भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाले झाले. त्यानंतर अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. भल्या पहाटे हा शपथविधी सोहळा झाला होता. त्यानंतर राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार अवघ्या 80 तासांतच गडगडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राज्यात महाविकास आघाडी (शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस) ची सत्ता स्थापन झाली. हेही वाचा- Corona Updates: देशातल्या कोरोना व्हायरस संदर्भातील मोठी बातमी  राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं, असंही फडणवीस म्हणालेत. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं असल्याचंही फडणवीस म्हणालेत. त्यावेळी मनात खूप राग आणि भावना होत्या. त्यामुळे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते चुकीचं होतं. आमच्या काही समर्थकांनाही ते आवडलं नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. या शपथविधीमुळे आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेली. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं, असं फडणवीस यावेळी म्हणाले. 80 दिवसांचं सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Maharashtra politics

पुढील बातम्या