मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Assembly Monsoon Session : भाजपशी युती तोडली तेव्हा गद्दारी नव्हती का? उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

Maharashtra Assembly Monsoon Session : भाजपशी युती तोडली तेव्हा गद्दारी नव्हती का? उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

'गद्दार या शब्दाची व्याख्या मला कळत नाही. त्यामुळे गद्दार या शब्दाची व्याख्या महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली पाहिजे

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 18 ऑगस्ट : शिवसेनेतून शिंदे गटात (shinde group) सामील झालेल्या आमदारांना गद्दार म्हणून सारखी टीका केली जात आहे. पण, भाजप आणि शिवसेनेची जेव्हा युती होती, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले, ती गद्दारी नव्हती का? असा परखड सवाल शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता केली. पावसाळी अधिवसेनामध्ये शिंदे गटाच्या आमदारांविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी' अशी घोषणाबाजी केली. त्यामुळ शिंदे गटाचे आमदार कमालीचे अस्वस्थ झाले आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी याला जशास तसेच उत्तर दिले. 'गद्दार या शब्दाची व्याख्या मला कळत नाही. त्यामुळे गद्दार या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर, त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगताय की, आमची नैसर्गिक आघाडी नव्हती. ही आघाडी कशी झाली, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती तर काही म्हणण्याचे कारण नव्हते. पण शिवसेना आणि भाजप एकत्र लढली मतदारांनी आम्हाला संधी दिली. त्यानंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दारी होत नाही का? असा सवाल सामंत यांनी उपस्थितीत केला. (नाराज बच्चू कडू अखेर अधिवेशनाला आले, शिंदे सरकारची काढली चूक, फोन टॅपिंग प्रकरणावरही भडकले) 'भाजपच्या खात्यांना किती पैसे मिळाले आणि शिवसेनेला किती पैसे मिळाले. हा 60 चा रेश्यू होता. त्यामुळे गैरसमज पसरवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही कुणालाही टार्गेट करत नाही. सर्व केंद्राच्या स्वतंत्र्य संस्था आहे. त्यांना तपास करण्याचा पूर्ण अधिकारी आहे. तपास यंत्रणा या त्यांचं काम करत आहे, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी अजित पवार यांच्याबाबत केली.
First published:

पुढील बातम्या