भाजप- राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं का? भाजप नेते काय म्हणताहेत पाहा...

भाजप- राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं का? भाजप नेते काय म्हणताहेत पाहा...

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याबद्दल भाजपतर्फे अधिकृतरीत्या पत्रकार परिषद घेण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर  : सत्तेसाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांना वेड लागलं आहे. त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा, असं सांगणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याबरोबर सूत कसं जुळलं असं विचारलं तेव्हा त्यांनी या प्रश्नाला सुरुवातीला बगल द्यायचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याबद्दल भाजपतर्फे अधिकृतरीत्या पत्रकार परिषद घेण्यात आली. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत दानवे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतलं. राज्यपालांनी काय करावं, याबाबत राउतांनी बोलू नये. शिवसेनेनं अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अजून ठरवलेला नाही. राष्ट्रवादीने निवडलेल्या गटनेत्याने भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसचा तर अजून गटनेताच निवडला गेलेला नाही. राज्यपाल अशा परिस्थितीत काय निर्णय घेणार? काँग्रेसने कोणाला विधीमंडळ गटनेतेपद अजून दिलेलं नाही. कुणाला निमंत्रण देणार? असा सवाल त्यांनी केला.

वाचा - संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, दानवेंचा टोला

अजित पवार यांनी एका कार्यकर्त्याबरोबर बोलताना गौप्यस्फोट केल्याविषयीचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपबरोबर जायचं आधीच ठरलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं, याबाबत तुम्हाला माहिती आहे का, या प्रश्नावर दानवे म्हणाले, "असं सगळं काही तुम्हाला सांगता येणार नाही."

वाचा - 53 आमदारांचा पाठिंबा असूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची मनधरणी का करतेय?

राज्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. शेतकरी दुःखात आहे, अशा परिस्थितीत तीनही पक्षांचे आमदार मात्र मुंबईत पाहुणचार झोडत आहेत. भाजपचे आमदार मतदारसंघात फिरत आहेत तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार मात्र फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार झोडत आहेत. एका हॉटेलमधून दुसरीकडे त्यांना हलवण्यात येतंय. ते का हे कळत नाही.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर वार

शिवसेनेवर टीका करताना दानवे यांनी अयोध्येच्या राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेनं राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण प्रत्यक्षात शिवसेनेला स्वतःचा वकीलही नेमता आलेला नाही.

वाचा - काय आहे अजित पवारांच्या मनात? चार तासांच्या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले..

काँग्रेसचे कपिल सिबल यांनी सेनेची बाजू मांडली. हेच सिब्बल अयोध्येच्या राम मंदिर खटल्याच्या वेळी - राम काल्पनिक आहे. वास्तव नाही, असं म्हणाले होते.  मे 2014 मध्ये संजय राऊत यांनी कपिल सिब्बलांवर लेख लिहिला होता. त्यात त्यांची वाईट भाषेत अवहेलना केली होती. आता मात्र शिवसेनेला हेच सिब्बल वकील म्हणून चालतात आणि ते काँग्रेसबरोबर घरोबा करतात. त्यांचीच मदत आज शिवसेना घेत केस लढत आहे.

First Published: Nov 25, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading