मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी

नारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी

राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने महाबळेश्वर तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने महाबळेश्वर तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने महाबळेश्वर तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले आहे.

सातारा, 24 जुलै : माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना मोठा झटका बसलाय. नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा राणे यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने अटक वाॅरंट जारी केला आहे. वनसृदश्य जमिनीवर अवैध बांधकाम केल्याप्रकरणी न्यायालयाने हा अटक वाॅरंट जारी केला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने महाबळेश्वर तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले आहे.

Maratha Morcha Andolan: मराठा मोर्चाची उद्या मुंबई बंदची हाक

यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा राणे यांचा समावेश आहे. केंद्र शासनाने महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करुन बांधकामाप्रमाणेच वन अधिनियमाची नियमावली तयार केली आहे. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनिकांनी ही बांधकामे सुरू ठेवली आहेत. आता या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने अटक वाॅरंट जारी केलंय. या वाॅरंटनुसार नीलिमा राणे यांना 30 जुलैच्या आत कोर्टासमोर हजर राहावे लागणार आहे. जर नीलिमा राणे यांनी 20 हजार रुपयांचं दंड भरला तर त्यांना जामीन मिळू शकतो अथवा पुढील कारवाई केली जाईल. माओवाद्यांच्या गडात पोहोचली 20 हजार जिवंत काडतूसं,दिल्लीत दुसरी रसद पकडली काय आहे प्रकरण ? केंद्र सरकारने देशात प्रथम महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल म्हणून जाहीर करत येथील बांधकामाच्या नियमावलीत बदल करण्यात आला. या बदलाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी उच्च स्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली. या समितीने तालुक्यातील शेत जमिनींचे एन ए बंद केले. बांधकामाच्या परवानगीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले. तसंच बांधकामाप्रमाणेच वन अधिनियमाची नियमावली कडक तयार करण्यात आली. असं असतानाही पालिका अथवा महसूल विभागातील अधिकारी यांना हाताशी धरून धनिकांनी वनसदृश्य मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकामे सुरू ठेवली. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने बॉम्बे इन्व्हारल अॅक्शन ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेच्या हेमा रमाणी यांनी २०१६ मध्ये वनसदृश्य जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामाबाबत दिल्ली येथील राष्ट्रीय हरीत लवादाकडे तक्रार दाखल केली.

VIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

भूमी अभिलेखा आणि महसुल विभागाने २००६ साली तालुक्यातील वनसदृश्य खाजगी मिळकतींची पाहणी केली होती आणि तसा अहवाल शासनास सादर केला होता. बीईएजी या संस्थेने राष्ट्रीय हरीत लवादाकडे केलेल्या तक्रारीमध्ये या अहवालाचा आधार घेतला आहे. हेमा रमाणी यांनी केलेल्या तक्रारीची हरीत लवादाने गंभीर दखल घेतली असून पहिल्या टप्प्यात ३३ वनसदृश्य मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलिमा राणे यांच्यासह बॅकींग, उदयोग, राजकीय, चित्रपट, सहकार, बांधकाम क्षेत्रातील दिग्गज धनिकांचा समावेश आहे.
First published:

Tags: Mahabaleshwar, Narayan rane, Narayan Rane wife, Neelim rane, Wife, महाबळेश्वर

पुढील बातम्या