Cyclone MAHA : पुढचे 3 दिवस पावसाचे, किनारपट्टीला धोका; 'या' दिवशी धडकणार महा चक्रीवादळ

अरबी समुद्रात निर्माण झालेलं महा चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस वादळी पावसाचे असतील.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 07:16 PM IST

Cyclone MAHA : पुढचे 3 दिवस पावसाचे, किनारपट्टीला धोका; 'या' दिवशी धडकणार महा चक्रीवादळ

मुंबई, 4 नोव्हेंबर : दिवाळी संपली, नोव्हेंबर उजाडला तरी पावसाचा मुक्काम अजून संपलेला नाही. पुण्याला आज पुन्हा वादळी पावसाने झोडपलं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादाळाचा प्रभाव आणखी चार दिवस कायम राहणार आहे. चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस वादळी पावसाचे असतील.

अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरित झालेलं महा हे वादळ हळूहळू गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकू शकतं. अरबी समुद्रातलं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं आलं तर त्याचे परिणाम संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला जाणवू शकतील, असा अंदात भारतीय हवामान विभागाने IMD नोंदवला आहे. गुजरातला याचा मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात  ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना याचा फटका अधिक बसेल. यामुळे उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.  धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'महा'चा परिणाम

दीवचा समुद्रकिनारा आणि गुजरातच्या पोरबंदर बंदराच्या दरम्यान हे वादळ जमिनीला धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होईल आणि त्यानंतर त्याचा जोर थोडा कमी होत जाईल.

वाचा - दिल्ली प्रदूषणानंतर टीम इंडियावर ‘महा’ चिंता! भारताला गमवावी लागेल मालिका

Loading...

6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. 120 किमी प्रतितास पर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातही इशारा

5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान पुणे शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह ,विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 6 नोव्हेंबरला 25 ते 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असंही हवामानात विभागाचे अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे.

वाचा - पावसाचा अंत्ययात्रेला फटका, पूल तुटल्याने मानवी साखळी करून न्यावं लागलं पार्थिव

7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पावसाची तीव्रता कमी होईल मात्र ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय

किती दिवस लांबणार पाऊस?

मान्सून लांबला आणि परतीचा पाऊसही लांबला. त्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरी राज्याला थंडीची अजूनही प्रतीक्षा आहे. क्यार चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून ऐन दिवाळीत राज्याला पावसाचा फटका बसला. त्यापाठोपाठ आता अरबी समुद्रात महा वादळ निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांबरोबर  हजारो मच्छीमारांना या वादळाचा फटका बसणार आहे. सध्या हवामान विभागाचा इशारा आल्यामुळे बहुतेक सर्व मच्छीमार बोटी किनाऱ्याला नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे रोजचा 150 कोटींची तोटा होत असल्याचं अर्नाळा किनाऱ्यावरच्या मच्छिमारांनी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांना सांगितलं.

--------------

अन्य बातम्या

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

Google Pay वरून 2 रुपये भरले आणि पुढच्या क्षणी बसला 40000 चा फटका

VIDEO : भाजप-सेनेच्या वादाचा नवा अंक सुरू, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...