मुंबई, 19 मार्च: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चढला (Temprature rises in Maharashtra) असून शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे. असं असताना पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी खुप महत्त्वाचे आहेत. कारण मुंबई हवामान खात्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा (Weather alert for next 5 days) दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातही (Marathwada) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यातील एक-दोन ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Update today)
आज 19 मार्च रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत साधारणतः 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा हातातोंडाला आलेला घास जमीनीदोस्त होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गहू पीक काढणीला आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर गहू काढण्याची गरज आहे.
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वार्याडच्या आंतर क्रिये च्या प्रभावा खाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात मध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे सोबतच एक किंवा दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे pic.twitter.com/d4h5bFCZNw
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 16, 2021
हे ही वाचा -Nagpur : भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक, दोन शेतकऱ्यांसह तिघे ठार; 8 जखमी
तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात 20 आणि 21 मार्च रोजी या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जना आणि पाऊस अशा प्रकारच वातावरण मध्य महाराष्ट्रासहीत मराठवाडा आणि विदर्भात राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यातील वातावरणात मोठे बदल होणार आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात धांदल उडू शकते. हा त्रास वाचवण्यासाठी नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD FORECAST, Maharashtra, Todays weather, Weather update