मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Raksha Bandhan : बहीण-भावांसाठी पोस्टाची खास योजना; 10 रूपयांत कुठेही पाठवा राखी, VIDEO

Raksha Bandhan : बहीण-भावांसाठी पोस्टाची खास योजना; 10 रूपयांत कुठेही पाठवा राखी, VIDEO

पावसात राखी भिजू नये म्हणून पोस्टाच्या वतीने खास वॉटरप्रूफ पाकिटे तयार करण्यात आलेली आहेत. लिफाफ्याच्या विक्रीसाठी टपाल कार्यालयांमध्ये स्वतंत्र काउंटर उभारण्यात आले आहेत.

    वर्धा, 03 ऑगस्ट : बहीण-भावाच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा सण राखीपौर्णिमा (Raksha Bandhan) अगदी जवळ आला आहे. नात्याचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी पोस्टाने देखील पुढाकार घेतला आहे. आपल्या भावाला राखी पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बहिणींनी गर्दी केली आहे. पावसात ही राखी भिजू नये म्हणून पोस्टाच्या वतीने खास वॉटरप्रूफ पाकिटे तयार करण्यात आलेली आहे. बाजारात देखील यावेळी विविध आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत. दूर राहणाऱ्या भावाकडे राखी बांधण्यासाठी बहीण जाऊ शकत नाहीत. मात्र, आता अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. बहिणी घरापासून लांब राहणाऱ्या भावांना राखी पाठवू शकतात. या कामासाठी टपाल विभागाची मदत घेऊ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खास राखी पाकिटांची विक्री सुरू झाली आहे. राखी लिफाफा पूर्णपणे जलरोधक आणि सुगंधी आहे. या लिफाफ्याच्या विक्रीसाठी विभागातर्फे विभागातील तीनही प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये स्वतंत्र काउंटर करण्यात आले आहेत. हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं लिफाफ्याची किंमत १० रुपये निश्चित करण्यात आली आहे.  भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन यावेळी ११ ऑगस्टला साजरा होणार आहे. भावापासून दूर राहणाऱ्या बहिणींना राखी पाठवणे कठीण मानले जाते. अशा स्थितीत टपाल विभागाने दरवर्षीप्रमाणे विभागातील वर्धा  पोस्ट ऑफिसमध्ये रक्षाबंधन विशेष राखीची विक्री सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र काउंटर बनवण्यात आले आहे. राखीचा लिफाफा पूर्णपणे जलरोधक असेल. तसेच लिफाफा रंगीत असल्याने, इतर लिफाफ्यांपेक्षा वेगळा दिसतो.  या लिफाफ्यात राखी ठेवून ती देशात कुठेही स्पीड पोस्ट, रजिस्ट्री आणि सामान्य पोस्टाने पाठवता येते, अशी माहिती प्रधान डाकपाल अविनाश अवचट यांनी दिली. बाजारात विविध प्रकारचे राख्या दाखल  यावेळी राखी पौर्णिमेनिमित्त डायमंड स्टोन, मोती राखी, रेशमी राख्या यासह विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यासह बाजारपेठ भेटवस्तूंचे देखील फुलली आहे. बदलत्या आवडी निवडीनुसार राख्यांमध्ये नवनवे प्रकार पहावयास मिळत आहेत. भाऊ बहिणीच्या अजोड नात्याला साजरे करण्यासाठी रंगीबेरंगी राख्यांनी शहरातील विविध भागातील बाजारपेठ सजल्या आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report बच्चे कंपनीच्या आवडत्या राख्या बच्चे कंपनीला आवडणारे कार्टून, हिरो आदींचे चित्र असलेल्या विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार सजला आहे. यात छोटा भीम, कृष्णा यासह म्युझिक व लाईट असलेल्या असंख्य प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागरिकांमध्ये राखीचा उत्साह दिसून येतो. सेंटिन रिबिन वापरून तयार केलेले रेशमी धाग्याच्या गोंड्याच्या, तुळशीचे मणी, रुद्राक्षाचा वापर केलेल्या राख्या याला पोवेतो म्हणतात. या लहान राख्या 20 रुपये डझनापासून विक्रीला आहेत. राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राखीच्या किमती 2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 10 रुपयापासून राख्या विक्रीस असल्याचे राखी विक्रेते प्रतिक जयस्वाल यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Festival, Wardha, Wardha news

    पुढील बातम्या