मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : घरकूल योजनेत वर्धा जिल्हा राज्यात चमकला, पाहा काय केलं विशेष?

Video : घरकूल योजनेत वर्धा जिल्हा राज्यात चमकला, पाहा काय केलं विशेष?

X
जिल्ह्यात

जिल्ह्यात 1232 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यातील 999 घरकूल ही भौतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्ण करण्यात आली आहेत .

जिल्ह्यात 1232 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यातील 999 घरकूल ही भौतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्ण करण्यात आली आहेत .

  • Local18
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 30 नोव्हेंबर : महाआवास अभियान अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा  जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा द्वितीय क्रमांकावर आहे. योजनेअंतर्गत अभियान कालावधीत 1232 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यातील 999 घरकूल ही भौतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्ण करण्यात आली आहेत .  वर्ध्यात झालेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

घरकूल बांधकामामध्ये गुणवत्ता व गतिमानता येण्यासाठी महाआवास अभियान राबविण्यात येते. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना जसे रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना राबविल्या जातात. तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकूल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या योजना राबविल्या जातात. या योजनेतील राज्य पुरस्कृत घरकूल योजनेत उत्कृष्ट कामासाठी जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला.

पालकांनो, मुलांची काळजी घ्या! मुंबईनंतर वर्ध्यात ‘गोवरछाया’ 7 मुलं पॉझिटिव्ह

जिल्ह्याचा गौरव

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या अमृत महाआवास अभियान शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्धा जिल्ह्याच्या वतीने तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ऑम्बासे, कार्यरत मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी पुरस्कार स्वीकारले.

महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!

1232 घरकुलांना मंजुरी

महाआवास अभियानात वर्धा जिल्ह्याला दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचे खरे श्रेय गावांचे सरपंच, लाभार्थी, ग्रामसेवक, स्थापत्य अभियंता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना जाते.  राज्य पुरस्कृत आवास योजना  जिल्ह्यात 2020-21 राबविण्यात आली. राज्यपुष्ठ योजनेत, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अशा योजनेअंतर्गत अभियान कालावधीत 1232 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यातील 999 घरकूल ही भौतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती विश्वास सिद प्रकल्प संचालक जि. ग्रा. वि. य, वर्धा यांनी दिली आहे.

First published:

Tags: Local18, Wardha