मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News : पाण्यावर साकारली महामानवाची रांगोळी, तरुणीने वर्ल्ड रेकॉर्डला घातली गवसणी, Video

Wardha News : पाण्यावर साकारली महामानवाची रांगोळी, तरुणीने वर्ल्ड रेकॉर्डला घातली गवसणी, Video

X
वर्धा

वर्धा जिल्ह्यातील एका तरूणीनं रांगोळी कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवलाय. त्यांनी या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदन केलंय.

वर्धा जिल्ह्यातील एका तरूणीनं रांगोळी कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवलाय. त्यांनी या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदन केलंय.

अमिता शिंदे, प्रतिनिधी

वर्धा, 18 मे : आपलं नावाची दखल जागतिक पातळीवर घेतली जावी ही अनेकांची इच्छा असते. पण, यासाठी लागणारी मेहनत आणि जिद्द काही जणांमध्येच आढळते. वर्धा जिल्ह्यातील एका तरूणीनं रांगोळी कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे.त्यांच्या या कलेमुळे वर्ध्याचं नाव जागतिक पातळीवर घेतलं जातंय.

पूनम दीपक तरोणे (केने) असं या विक्रम करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक पोट्रेट रांगोळी अगदी कमी कालावधीमध्ये पाण्यावर साकारलीय. अवघ्ये 11 मिनिटं 32 सेकंद आणि 98 मिली सेंकदमध्ये त्यांनी ही पोट्रेट रांगोळी पाण्यावर साकारलीय. कोणतेही स्केच किंवा टूलचा वापर न करता त्यांनी ही रांगोळी काढलीय. त्याची दखल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनंही घेतली आहे.

यापूर्वीही केला रेकॉर्ड

पूनम यांनी यापूर्वी इंडिया बुक, आंतरराष्ट्रीय युथ स्किल अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार (स्पेन) या सर्व रेकॉर्डबुकमध्ये स्वत:चं नाव नोंदवलंय. त्यांनी यापूर्वी महात्मा गांधी यांची पेंटिंग 8 मिनिटांमध्ये करत इंडिया बुकमध्ये नाव नोंदवले होते.

असा शिवभक्त होणे नाही! सुट्टीच्या दिवशीही राजाची करतो सेवा, VIDEO

नुकतंच संसारी आयुष्य सुरू केल्यानंतरही त्यांनी आपला फोकस कायम ठेवलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पोर्ट्रेट रांगोळी पाण्यावर साकारून आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमाला गवसणी घातलीय.  आता पुनम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद करून आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांनी हा रेकॉर्ड करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांचे पती दिपक तोरणे यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Dr. Babasaheb Ambedkar, Local18, Wardha