मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू, ढगफुटी सदृष्य पाऊस

Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू, ढगफुटी सदृष्य पाऊस

वर्ध्यात (wardha) दोन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडत आहे. (wardha district heavy rainfall) त्यामुळं अनेक नदी नाल्याना पूर आला.

वर्ध्यात (wardha) दोन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडत आहे. (wardha district heavy rainfall) त्यामुळं अनेक नदी नाल्याना पूर आला.

वर्ध्यात (wardha) दोन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडत आहे. (wardha district heavy rainfall) त्यामुळं अनेक नदी नाल्याना पूर आला.

  • Published by:  Sandeep Shirguppe

वर्धा, 10 जुलै : वर्ध्यात (wardha) दोन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडत आहे. (wardha district heavy rainfall) त्यामुळं अनेक नदी नाल्याना पूर आला. यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला, तर धोत्रा शिवारात 10 मजूर पुरात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात लाईफ गार्डच्या जवानांना यश आले. वेगवेगळ्या ठिकाणी दोघे जण पुरात वाहून गेले. तर दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. (wardha district lightning two death) वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. (Wardha Rain Update)

दरम्यान पावसाच्या थैमानाने अनेक भागात पाणी साचलं असून अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. शेतातून पाणी गेल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावातील घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबाच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. घरात दोन ते चारफुट पाणी साचल्याने अनेक कुटुंबं उघड्यावर आले आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्त्यावरील पुलावरून पूराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. वर्धा, देवळी, पुलगाव, अल्लीपुर, हिंगणघाट या परिसरात पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे.

हे ही वाचा : गडचिरोली : चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक; तिघांचे मृतदेह सापडले

वीज पडून दोघांचा मृत्यू

वर्धा तालुक्यातील कुरझडी व नांदगाव शिवारात वीज पडून शेतकरी महिला व पुरुषाचा मृत्यू झाला. नांदगाव येथील शेतकरी महिला गीता  मेश्राम ही पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली बसली असता हिच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर कुरझडी येथील शेतकरी श्रीराम शेंडे यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.

भदाडी नदीच्या तीरावर तब्बल 10 मजूर अडकले, प्रशासनाला वाचवण्यात यश

जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे वर्धा -पुलगाव मार्गावरील भदाडी नदीला पुर आला. यात भदाडी नदीच्या तीरावर 10 मजूर अडकले. भदाडी नदीच्या बाजूला असलेल्या शेतात कामासाठी गेलेले 10 मजूर अडकल्याने प्रशासनाने दोन तासापासून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करीत 10 मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये एक महिलेची प्रकृती बिघडल्याने त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे.

हे ही वाचा : VIDEO: भाजपा आमदाराच्या घराबाहेर सापडली चोरीची बॅग, काही दिवसांपूर्वीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

शहराच्या अनेक भागात पाणीच पाणी

शहराच्या नालवाडी भागातील काचोळे ले-आऊट, शिवारपण नगर भागात मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य स्थिती पहायला मिळाली. या नगरात अनेक सखल भागातील घरात पाणी शिरल्याचे दिसून आले.

लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

लालनाला प्रकल्पाचे पाच दरवाजे  उघडल्याने हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

जिल्हा आपत्तीव्यवस्थापन अलर्ट मोडवर

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळं जिल्ह्यात लहान मोठ्या घटना बघता जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

First published:

Tags: Monsoon, Rainfall, Wardha, Wardha news, Weather update

पुढील बातम्या