मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /wardha : पुलाचा कठडा तोडून एसटी बस कोसळणारच होती, पण..,40 प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव

wardha : पुलाचा कठडा तोडून एसटी बस कोसळणारच होती, पण..,40 प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव

आर्वी वर्धा मार्गावरील येळाकेळी येथे बस अचानक अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला धडकली.

आर्वी वर्धा मार्गावरील येळाकेळी येथे बस अचानक अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला धडकली.

आर्वी वर्धा मार्गावरील येळाकेळी येथे बस अचानक अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला धडकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 29 ऑगस्ट : वर्धा जिल्ह्यात एसटी बसचा मोठा अपघात अगदी थोडक्यात टळला आहे. पुलाच्या कठड्याला बस अडकल्याने पुलाखाली कोसळताना बचावली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. या अपघातात सर्व सुखरूप आहे मात्र बसचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी वर्धा मार्गावरील येळाकेळी येथे बस अचानक अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला धडकली. बस कठड्याला अडकल्याने पुलाखाली कोसळताना थोडक्यात वाचली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच 40 वाय 5297 ही बस वर्धेतून आर्वीला 40 प्रवासी घेऊन जात होती.

(कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू, या दोन दिवशी मुंबईकडे येणाऱ्या वाहतूकीत बदल)

दरम्यान, बस अचानक अनियंत्रित झाली आणि बस पुलाच्या कठड्याला धडकत बसचा पुढचा एक चाक पुलाच्या खाली गेला. सुदैवाने या घटनेत सगळे प्रवासी सुखरूप राहिले मात्र बसचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. या घटनेनंतर बसमधील प्रवासी आणि चालकामध्ये भीतीचे वातावरण पहावयास दिसत होते. घटनास्थळी पोलिसांनी येत वाहतूक सुरळीत केली.

अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरघाव कारने उडवले

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील भद्रकाली हद्दीच्या जुन्या नाशकातील मध्यरात्रीच्या या घटनेचा थरार पाहण्यास मिळाला. शितळादेवी मंदिर समोरील अमरधामला, सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरघाव वेगानं आलेल्या मांझा कारनं समोरून जबर धडक दिल्याची ही घटना घडली आहे.

(आगीशी खेळ अंगाशी आला, फुंक मारताच तरुण पेटला; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO)

या घटनेत रस्त्यावर उभे असलेले दहा तर कारमधील पाच, असे पंधरा जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सिडकोतील रहिवासी, सिटीलिंक बसवाहक असलेल्या मकरंद पंचाक्षरीचा मृत्यू झाल्याने मध्यरात्री त्याच्या अंत्यविधीसाठी नाशिक अमरधामला अनेक सिटीलिंक कर्मचारी आले होते. त्यातील काहीजण बाहेर रस्त्यावर उभे असताना पंचवटी अमरधाम कडून नानावलीकडे भरघाव वेगानं जाणाऱ्या एम एच 05 ए एक्स 3957 या क्रमांकाची मांझा कार, समोर उभ्या असलेल्या घोळक्यावर जाऊन धडकली. त्यात रस्त्यावर उभे असलेले दहा जण जखमी झाले तर कार चालकासह गाडीत बसलेले पाच असे एकूण पंधरा जण जखमी झाले. भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे,यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी नागरिकांना खाजगी वाहनात बसवून जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारसाठी दाखल करण्यात आलंय.

First published:

Tags: Marathi news, St bus accident, Wardha