मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्य!, 'माझी वसुंधरा अभियाना'त वर्धा नगर परिषद राज्यातून चौथी

Wardha : पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्य!, 'माझी वसुंधरा अभियाना'त वर्धा नगर परिषद राज्यातून चौथी

फाईल फोटो

फाईल फोटो

पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यात 'माझी वसुंधरा अभियान' राबविण्यात येत असून झालेल्या कामांच्या सर्वेक्षणात नगर परिषद एप्रिल 2022 मध्ये राज्यस्तरावर आली आहे. या अंतर्गत नर्सरीची निर्मिती करणे, हिरवेगार क्षेत्र तयार करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचे नियोजन करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, हवेची गुणवत्ता राखणे, आदी पर्यावरणपूरक कामे केली जातात.

पुढे वाचा ...
    वर्धा, 16 जून : मानवाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करणे तसेच पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करुन निसर्गपूरक जीवनपद्धतीचा अवलंब करणे यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ (Majhi Vasundhara Abhiyan) राबवण्यात येते. अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी निसर्गाशी संबंधित पाच घटकांवर केलेल्या कामाचे मूल्यमापन करुन क्रमांक दिले जातात. यात वर्धा नगर परिषदेला (Wardha Municipal Council) राज्यात चौथा तर विदर्भातून दुसऱ्या क्रमांक मिळाला आहे. वाचाAkola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल!
    पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यात 'माझी वसुंधरा अभियान' राबविण्यात येत असून झालेल्या कामांच्या सर्वेक्षणात नगर परिषद एप्रिल 2022 मध्ये राज्यस्तरावर आली आहे. या अंतर्गत नर्सरीची निर्मिती करणे, हिरवेगार क्षेत्र तयार करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचे नियोजन करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, हवेची गुणवत्ता राखणे, आदी पर्यावरणपूरक कामे केली जातात. ही कामे उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे वर्धा नगर परिषदेला 3081 गुण मिळाले आहेत. 4481 गुणांसह सातारा नगरपरिषद पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया तर तिसऱ्या क्रमांकावर भुसावळ नगरपरिषदेचा समावेश आहे. वाचाबीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT …ही कामे अपेक्षित होती पृथ्वी घटक संबंधित वनीकरण, वन संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा निचरा व्यवस्थापन, जमीन ध्रुविकरण. हवेच्या घटकाच्या संवर्धनाचा उद्देश हवा गुणवत्ता सुधारणे, जल घटकांशी संबंधित नदी संस्कृती, सागरी जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण, अग्नी घटकाशी संबंधित ऊर्जेचा कार्यक्षम वापर, ऊर्जेची बचत आणि अपव्यय रोखणे, अपारंपरिक ऊर्जा आणि या घटकाखालील आकाश निर्मितीचे उपक्रम, या स्वरुपातील जागा आणि प्रकाश निश्चित करुन मानवी स्वभावात बदल घडवून आणण्यासाठी जनजागृती करणे. तसचे कार्य मोहिमेअंतर्गत शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी अपेक्षित होते. या मोहिमेत शहरात ठिकठिकाणी 3857 झाडे लावण्यात आली असून, आयटीआय टेकडी येथील ऑक्सिजन पार्कमधील हेरिटेज वृक्षांचे सर्वेक्षण, इंझापूर डम्पिंग यार्डमध्ये वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खत तयार करुन शेतकरी व खासगी व्यक्तींना विक्री करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजकावर रोपे लावणे तसेच जनजागृतीसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली, पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रोत्साहन, एलईडी दिवे लावून ऊर्जा बचत, घरपोच कंपोस्ट खत तयार करून 350 अनुदान, बंदी प्लॅस्टिकच्या पिशव्या, कापडी पिशव्या बनवण्याच्या कामात बचत गटांना रोजगार देणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, उद्यानांचे सुशोभीकरण इत्यादी. "सर्वांच्या सहकार्याचे फळ" “नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांचे अथक परिश्रम आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे, माझी वसुंधरा अभियानात वर्धा नगरपरिषदेला राज्यातून मिळालेल्या यशाने सर्वांचे मनोबल वाढले आहे,” असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Environment, Wardha news

    पुढील बातम्या