मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News: सरपंचाची अनोखी शक्कल, गावात फुकटात मिळतं दळण पण..., पाहा Video

Wardha News: सरपंचाची अनोखी शक्कल, गावात फुकटात मिळतं दळण पण..., पाहा Video

X
Wardha

Wardha News: सरपंचाची अनोखी शक्कल, गावात फुकटात मिळतं दळण पण..., पाहा Video

वर्धा जिल्ह्यातील मनसावळी ग्रामपंचायतीनं एक भन्नाट उपक्रम सुरू केला आहे. गावातील लोकांना फुकटात दळण दळून दिले जात आहे.

अमिता शिंदे, प्रतिनिधी

वर्धा, 20 मे: नागरिकांकडून कर गोळा करणं म्हणजे तसं अवघडच काम असतं. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीचं कर संकलन होत नाही. वर्धा जिल्ह्यातील मनसावळी ग्रामपंचायतीनं कर संकलनासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीनं पिठाची चक्की सुरू केली असून गावकऱ्यांना थेट मोफत दळण दळून देत आहे. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार ज्या नागरिकानं 100 टक्के कर भरणा केला आहे, त्यालाच ही मोफत दळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सर्वत्र या गावच्या चक्कीची चर्चा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील राळेगाव मार्गावर मनसावळी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या बाराशे इतकी आहे. या ग्रामपंचायतीने मुख्यतः कर वसुलीसाठी जी नामी शक्कल लढविली आहे, त्यामुळे सर्वत्र या ग्रामपंचायतीची चर्चा आहे. 'कर भरा आणि एक वर्ष मोफत दळण दळून घ्या' या संकल्पनेने ग्रामपंचायतीला कर गोळा करण्यास अतिशय मदत मिळते आहे.

उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायत मनसावळीने ग्रामपंचायत कार्यालयातच 1 एप्रिल 2023 ला एक चक्की उभारली. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक घर कराची पावती चक्कीवर दाखवून गहू, ज्वारी, बाजरी, डाळ इत्यादी धान्य मोफत दळून नेत आहेत. या उपक्रमाने ग्रामपंचायतचे कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

Wardha News: गावाकडचे 'नूडल्स' खाल्लेत का? पाहा कसे तयार करतात सरगुंडे, Video

ग्रामपंचायत कर अखेर होतोय जमा

अनेकांनी गेली सात आठ वर्षे कराचा भरणाच केला नव्हता. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेल्या कर वसुलीसाठी कर्मचारी घरोघरी पोहोचले तरी प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव ग्रामपंचायत प्रशासनाला आला. मागील वर्षापर्यंत 70 ते 80 हजार एवढा कर जमा व्हायचा मात्र हा उपक्रम राबविल्यानंतर तब्बल 1 लाख 70 हजार ते 1 लाख 80 हजार पर्यंतची कर वसुली आतापर्यंत झालेली आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. यातून आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतीही कर भरण्यासाठी नवनव्या संकल्पना राबवू शकतात.

First published:
top videos

    Tags: Local18, Wardha, Wardha news