मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : बेपत्ता झालेली चार मुलं रेल्वेत चढताना ‘सीसीटीव्ही’त कैद, वर्धा पोलिसांच्या तपासाला वेग

VIDEO : बेपत्ता झालेली चार मुलं रेल्वेत चढताना ‘सीसीटीव्ही’त कैद, वर्धा पोलिसांच्या तपासाला वेग

बेपत्ता झालेली चार मुलं रेल्वेत चढताना ‘सीसीटीव्ही’त कैद

बेपत्ता झालेली चार मुलं रेल्वेत चढताना ‘सीसीटीव्ही’त कैद

सेलू तालुक्यातील मसाळा गावातून बेपत्ता झालेली चार अल्पवयीन मुलं वर्धा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  Chetan Patil

नरेंद्र मते, वर्धा, 25 सप्टेंबर : राज्यात मुलं बेपत्ता होण्याच्या अफवांना पेव फुटला आहे. अशातच वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये 4 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला होता. या बातमीमुले शेलू शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अखेर बेपत्ता झालेली मुलं वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामुळे ही मुलं नेमकं कोणत्या दिशेला गेली आहेत याचा काहीसा अंदाज पोलिसांना लागला आहे. पोलिसांनी या मुलांच्या तपासासाठी पथकं रवाना केली आहेत.

सेलू तालुक्यातील मसाळा गावातून बेपत्ता झालेली चार अल्पवयीन मुलं वर्धा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही मुलं शुक्रवारी ४.११ वाजताच्या सुमारास स्टेशन परिसरात दाखल झाली. त्यानंतर ते रेल्वेस्थानकावर फेरफटका मारताना दिसून आले. जवळपास पावणे दोन तास ही मुले स्टेशन परिसरात वावरत होती. ६ वाजून २१ मिनिटांनी वर्धा रेल्वेस्थानकावर एक एक्सप्रेस गाडीत शिरताना दिसली. खरंतर संबंधित १२९९३ क्रमांकाची पुरी विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन ही वर्धा रेल्वे स्थानकावर थांबत नाही. पण तांत्रिक कारणांमुळे ही गाडी फलाट क्रमांक १ वर थांबली. ही गाडी थांबताच चारही अल्पवयीन मुले गाडीच्या वातानुकुलीत डब्यात चढताना सीसीटीव्हीत दिसून आली. ६.२४ मिनिटांनी ही गाडी पुढच्या दिशेने रवाना झाली.

(पुण्याचं वातावरण तापलं! मनसे-युवासेना-भाजपचं आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुले आढळल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, रवींद्र गायकवाड यांनी आरपीएफ निरीक्षक रामसिंग मिना यांच्याशी संपर्क साधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मुले रेल्वेगाडीत चढताना दिसून आली. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडून पुढील तपासासाठी तत्काळ पथकांना रवाना करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मसाळा इथं ही घटना घडली होती. मसाळा येथील पप्पू देवढे (वय 13 वर्ष), राज येदानी (वय 13), राजेंद्र येदानी (वय 12), संदीप भुरानी (वय 8) अशी बेपत्ता मुलांची नाव आहे. शनिवारी पप्पू देवढे याला शाळेतून सकाळी 11 वाजता त्यांच्या वडिलांनी घरी आणले होते. त्यानंतर पप्पू देवढेचे वडील शेतात निघून गेले. त्यानंतर कामावरून सायंकाळी पाच वाजता दरम्यान घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पालकांमध्ये एकच घबराट पसरली. गावभर शोध घेऊन मुलांचा शोध लागला नाही. त्यानंतर पालकांनी सेलू पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. पप्पू देवढेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहे.

First published:

Tags: Wardha