मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sahitya Sammelan : 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान वर्ध्याला; विदर्भ साहित्य संघ करतंय जोरदार तयारी

Sahitya Sammelan : 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान वर्ध्याला; विदर्भ साहित्य संघ करतंय जोरदार तयारी

वर्धा जिल्ह्यात तब्बल 56 वर्षांनी सारस्वतांचा (Marathi Sahitya) महामेळा पुन्हा अनुभवता येणार आहे. कारण, 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan In Wardha) आयोजनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे.

वर्धा, 3 जून : वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. हा जिल्ह्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आहे, त्याचबरोबर साहित्यिकदृष्ट्याही (Marathi literature) हा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. अशा वर्धा जिल्ह्यात तब्बल 56 वर्षांनी सारस्वतांचा महामेळा पुन्हा अनुभवता येणार आहे. कारण, 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे. (Marathi Sahitya Sammelan In Wardha)

1967 मध्ये वर्ध्यात 48 वे संमेलन झाले होते. आता 2023 मध्ये म्हणजेच जवळपास 56 वर्षांनी ही संधी वर्ध्याला मिळाली आहे. महामंडळाच्या स्थळ समितीने वर्ध्याचा दौरा करत साहित्य संमेलनासाठी अपेक्षित जागा आणि राहण्याची सोय या सगळ्यां व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर वर्धा हे साहित्य संमेलन घेण्यासाठी योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे, अशी शिफारस केली होती.

वाचा : 18 वर्षांपासून एकही बाळाचा जन्म नाही, गावातल्या ‘या’ बाहुल्या ठरल्या जागतिक आकर्षणाचं केंद्र

यात घटक मंडळ असलेल्या विदर्भ साहित्य संघाने ही 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. यातच विदर्भ साहित्य संमेलनाचे शताब्दी वर्ष आहे. सोबत घटक संस्था म्हणून आमंत्रण दिल्याने त्या अनुषंगाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केल्याची माहिती उषा तांबे यांनी दिली होती.

संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. अभय बंग यांची निवडीची मागणी

वर्ध्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोबा-गांधी विचारांचे कृतिशील विचारवंत, लेखक, संशोधक पद्मश्री डॉ. अभय बंग हवेत अशी मागणी आता करण्यात येत आहे. आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्धा येथे होणार आहे. साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात अनेक नावे समोर येत आहेत. गांधी विनोबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास करणारे, गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक आणि संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची निवड व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

First published: