मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News: ड्रोनपासून ते रोबोटिक्स, शेतकऱ्याची मुलं बनताय शास्त्रज्ञ, पाहा SPECIAL REPORT

Wardha News: ड्रोनपासून ते रोबोटिक्स, शेतकऱ्याची मुलं बनताय शास्त्रज्ञ, पाहा SPECIAL REPORT

X
Wardha

Wardha News: ड्रोनपासून ते रोबोटिक्स, शेतकऱ्याची मुलं बनताय शास्त्रज्ञ, पाहा SPECIAL REPORT

वर्धा जिल्ह्यात अटल टिंकरिंग प्रयोगशाळा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. विद्यार्थीच रोबोटिक्स, ड्रोन सारखे मॉडेल तयार करत आहेत.

अमिता शिंदे, प्रतिनिधी

वर्धा, 27 मे: अटल टिंकरिंग प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता करिअर घडविण्यासाठी उत्तम मार्ग ठरत आहे. या शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपलं करिअर घडवून मोठा इंजिनियर बनण्याचे स्वप्न बघत आहेत. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात लोकमान्य विद्यालय येथे 2019 पासून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा कार्यरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या शाळेत प्रवेश घेत असून स्वतःचे मॉडेल बनवत आहेत.

टिंकर फेस्टिवल मध्ये विविध संकल्पना

अटल टिंकरिंग प्रयोगशाळेच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न साकार करु शकत आहेत. तालुक्यातील टिंकर फेस्टिवल मध्ये विद्यार्थी रोबोटिक्स, ड्रोन, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट यासारख्या विविध संकल्पना शिकत आहेत. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड करण्यात येते. विद्यालयात प्रत्येक वर्षातून दोन कार्यशाळांचे व एक टिंकर फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. तालुक्यातील 17 शाळा या फेस्टिवलमध्ये आपले विद्यार्थी सहभागी करतात.

21 गावखेड्यातील विद्यार्थ्यांना मार्ग सुकर

आष्टी तालुक्यातील 21 गावखेड्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर व मध्यमवर्ग कुटुंबातील मुले, मुली या प्रयोग शाळेतील उपक्रमामुळे प्रेरित होऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. विज्ञान हा विषय घेऊन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रयोगशाळा वरदानच ठरत आहे.

Success Story: याला म्हणता जिद्द, जन्मत: अंध, आईचं निधन, पण सोहमने जिंकून दाखवलं, Video

विद्यार्थ्यांची वाढतेय संख्या

लोकमान्य विद्यालय आष्टी येथे 2019 मध्ये सुरू झालेल्या टिंकरिंग लॅब मध्ये 345 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला. तसेच 2021-22 मध्ये 378 व 2023 मध्ये 400 च्या वर विद्यार्थी या प्रयोगशाळेचा लाभ घेत आहेत. या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून मागील सत्र 2022 - 23 मध्ये विज्ञान शाखेची दुसरी तुकडी उघडावी लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Education, Local18, Wardha, Wardha news