मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्ध्यात जन्म दाखल्यावरुन वाद; अन् पालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार

वर्ध्यात जन्म दाखल्यावरुन वाद; अन् पालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार

मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख हे पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे.

मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख हे पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे.

मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख हे पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  News18 Desk

वर्धा, 14 सप्टेंबर : राज्यात कायद्याचा वचक राहिला आहे का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक ठिकाणी हत्येच्या, मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. वर्धा येथे नगरपालिकेतील एका दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना नगरपालिकेत घडली. याप्रकरणी काल मंगळवारी 13 सप्टेंबरला शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख असे 35 वर्षीय कनिष्ठ लिपिक यांचे नाव असून ते दिव्यांग आहेत. तसेच मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख हे पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे.

13 सप्टेंबरला ते ते कर्तव्यावर असताना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुजित रमेश धवराठे आणि एक व्यक्ती असे दोन जण तिथे आले. आणि यावेळी मुलांच्या जन्म पत्राची मागणी त्यांनी केली. यावेळी आवेस यांनी त्यांना थोडे थांबण्यास सांगितले. यानंतर बाजूलाच असलेल्या मॅडमकडून प्रमाणपत्राची प्रत घेण्यास सांगितले.

मात्र, यावेळी दोघांनी अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तर पालिकेतील दिव्यांग लिपिक मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि याप्रकारे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

हेही वाचा - नागपूर : पत्नी असतानाही प्रेयसीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचा प्रियकर, संशयास्पद मृत्यू

या घटनेनंतर लगेचच मोहम्मद आवेस यांनी शहर पोलिसात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अशाप्रकारच्या घटनांमुळे राज्यात कायद्याचा वचक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Crime news, Wardha news