वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 29 मार्च : वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट होत असल्याने ते शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत घुसत असल्याचे प्रकार वाढले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी वनपरीक्षेत्रात असणाऱ्या सारंगपुरी येथे शिकारीच्या शोधात धावत असताना बिबट्या विहिरीत पडला. याबाबत शेतकरी साहेबराव दुधे यांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. तीन तासांच्या अथक परीश्रमानंतर 45 फूट खोल विहिरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
बिबट्या पडला विहिरीत
सारंगपुरी येथील विहिरीत शिकारीच्या शोधात असणारा बिबट्या नजरचुकीने पडला. याबाबत शेतकरी साहेबराव दुधे यांनी आर्वीचे वन परीक्षेत्र अधिकारी साहेबराव दुधे यांना माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांसह ते घटनास्थळी पोहोचले. विहिरीची 45 फूट खोली असल्याने बचावकार्य करणे कठीण होते.
तीन तास परिश्रमानंतर यश
बिबट्याच्या बचावासाठी योग्य नियोजन करण्यात आले. दोरीच्या साह्याने बाज (खाट) विहिरीत सोडण्यात आली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर बिबट्याला जंगल परिसरात नेऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. या कामात स्थानिक ग्रामस्थांनीही मदत केली.
भारीच! 30 वर्षांपासून कुत्र्यांना जगवणारा श्वानप्रेमी, पदरमोड करुन करतोय रोजचा खर्च!
बचाव पथकात हे होते सहभागी
या टीम मध्ये एन एस जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी यांचे मार्गदर्शनाखाली पी एम तंबाखे क्षेत्र सहाय्यक आर्वी, एस डी भेंडे क्षेत्रसाह्यक पिंपळखुटा, व्ही आर आडे क्षेत्र सहाय्यक रोहना, सीपी निघोट वनरक्षक सारंगपूर दक्षिण, जीएम धामंदे वनरक्षक सारंगपुरी, डी एम दुर्वे वनरक्षक सारंगपुरी उत्तर, जे बी शेख वनरक्षक गारपीट, एस बी भालेराव वनरक्षक दानापूर, आर एस राठोड वनरक्षक बोथली, डी जी भोसले वनरक्षक पांजरा, सिटी शेंडे वनरक्षक सामाजिक वनीकरण उपस्थित सर्व वनकर्मचारी उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news