मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : दहावी बोर्ड परीक्षेत नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू, पहा संपूर्ण माहिती

Wardha : दहावी बोर्ड परीक्षेत नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू, पहा संपूर्ण माहिती

दहावीचा नूकताच निकाल जाहीर झाला आहे. दहावी विद्यार्थ्यांनी यात चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अधिक असतील तरी सुद्धा यावर्षी 3 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून परत परीक्षा घेतली जाणार आहे.

पुढे वाचा ...
वर्धा, 20 जून: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra state board results 2022) नुकताच निकाल जाहीर कण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं. अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी (10th Supplementary Exam 2022) बोर्डाकडून आणखी एक संधी देण्यात आली असून त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी 20 जून ते 27 जून या कालावधीत फॉर्म भरू शकणार आहेत. तर 27 जुलैपासून परीक्षा होणार आहेत आहेत. फाॅर्म भरल्यानंतर एक महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना परीक्षेसचा अभ्यास करण्यासाठी मिळणा आहे. या रिपोर्टमधून पुरवणी परिक्षेबाबत आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत. वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी! महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा नूकताच निकाल जाहीर झाला आहे. दहावी विद्यार्थ्यांनी यात चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अधिक असतील तरी सुद्धा यावर्षी 3 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून परत परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी 20 जून ते 27 जून या कालावधीत फॉर्म भरू शकणार आहेत. जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन फॉर्म भरू शकणार आहेत.  मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी फॉर्म भरुन परीक्षेला बसू शकतील.  विद्यार्थी शाळेतून देखीलफॉर्म भरू शकतात. उत्तरपत्रिकेच्या फेर तपासणी आणि छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज  विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाईल. बोर्डाने जाहीर केलेल्या निकालावर नाराज असलेले विद्यार्थी सोमवारपासून बोर्डाच्या अर्जाचा नमुना, उत्तरपत्रिकेच्या फेर तपासणीसाठी आणि छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थी स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh-ssc.ac.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी २० जून ते बुधवार २९ जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी २० जून ते शनिवार, दिनांक ०९ जुलैपर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.  त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card / Credit Card / UPI / Net Banking याद्वारे भरता येईल. वाचा : Success Story : संसार सांभाळत नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’च्या विजेत्या, अशी घेतली मेहनत, पहा VIDEO 27 जुलैपासून होणार परीक्षा निकाल जाहीर करण्यासोबतच विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी बोर्डाने परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.  बोर्डाच्या माहितीनुसार, 10वीची लेखी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान, 10वीची तोंडी व इतर परीक्षा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.  विद्यार्थ्यांनी परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाणून घ्यावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही टाइम टेबलवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन करण्यात आले आहे.
First published:

Tags: Board Exam, Exam result, Maharashtra News, State Board, Wardha news

पुढील बातम्या