मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रवाशांच्या सेवेत वर्ध्याची ST धावू लागली वेगात, बसस्थानकांवर 24 तास प्रवाशांचा राबता सुरू, वाचा SPECIAL REPORT

प्रवाशांच्या सेवेत वर्ध्याची ST धावू लागली वेगात, बसस्थानकांवर 24 तास प्रवाशांचा राबता सुरू, वाचा SPECIAL REPORT

राज्यात एसटी आंदोलन (ST strike) संपल्यानंतर विविध जिल्ह्यांत बससेवा सुरू झालेली आहे. वर्धा जिल्ह्यातील लालपरीदेखील रुळावर आलेली आहे. सध्या वर्धा बसस्थानकातून (Wardha Bus Stand, Passenger) प्रवाशांच्या सेवेसाठी दररोज 200 बसेस धावत आहेत.

पुढे वाचा ...

वर्धा, 9 जून : एसटी कामगारांच्या बऱ्याच काळ चाललेल्या संपानंतर (ST strike) जवळपास सर्वच कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील लालपरीची सेवा सुरू झाल्याने वर्धा बसस्थानकावर (Wardha Bus Stand) प्रवाशांची गर्दी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लग्न सराईचा सीझन सुरू असल्याने बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे एसटीच्या नियमित उत्पन्नाची वाढ झालेली आहे. (ST buses started in Wardha district)

28 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील 5 आगारांतील एकूण 1458 कर्मचारी सहभागी झाले होते. सुरुवातीची दोन महिने जिल्ह्यात एसटी सेवा पूर्ण टक्के बंद राहिली होती. यानंतर सरकारने काही मागण्या मान्य करून कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. यावर काही कर्मचारी कामावर परतले. पण, काही संपावर होतेच. त्यामुळे एसटीच्या नियमित उत्पन्नावर परिणाम झाला. जिथे रोज 20 ते 22 लाख रुपये उत्पन्न मिळत होते, ते 3 ते 4 लाखांवर आले होते.

वाचा : मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी पालक भीक मागून गोळा करतायत पैसे, माणुसकीला काळिमा फासणारा VIDEO VIRAL

सुरुवातीच्या दिवसांत एकूण 224 बसेस जागेवर थांबल्या होत्या. आता 200 बसेस धावत आहेत. बराच वेळ बस उभ्या राहिल्याने त्याचा देखभाल खर्चही वाढला आहे, त्यामुळे काही बस वाटेतच बंद पडत आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर सध्या जवळपास सर्वच कामगार कामावर परतले आहेत. यासह जिल्ह्यात एसटी सेवा पूर्ववत झालेली आहे. काही आगारांमध्ये फेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत नाहीत, तर काही आगारांमध्ये जास्तीत जास्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

वाचा : Regional Ports Department : कोकणात पुढचे तीन महिने धोक्याचे, बंदर विभागाकडून alert, 26 वेळा समुद्राला येणार उधाण

सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने नियमित उत्पन्नही चांगले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे 750 फेऱ्या धावत असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातही लालपरी सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्धा बसस्थानकाचे एटीआय मनोज ढोले सांगितले की, "वर्धा आगारातील सर्व बससेवा सुरू झाल्या आहेत, फक्त ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात सुरू झाल्याने तिथे पास सुविधा देऊन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे बसस्थानकावर पुर्वीच्या तुलनेत गर्दी दिसत आहे."

वाचा : Post Office Schemes: पैसे बुडण्याची भीती नाही आणि बँकेपेक्षा जास्त व्याज; गुंतवणूकदारांना फायदा

बस प्रवासी ईश्वर मैश्राम म्हणतात की, "बसेस पुर्वीसारख्या सुरू झाल्याने मोठी सोय झाली आहे. त्यामुळे हवे तिथे सवलतीच्या दरात जाता येत आहे." महिला प्रवासी कोमल होनाडे म्हणतात की, "अनाठायी मागण्यामुळे बस आंदोलन चिघळत ठेवण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांचा बस प्रवासावरून विश्वास उडाला आहे. लोक आता खासगी वाहनांनी प्रवास करत आहेत."

First published: