मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती; या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती; या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

  वर्धा 18 जुलै : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतरचे काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाल्यांना पुर आले. तर काही धरणेही भरली. तसेच राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता राज्यात पावसाचा जोर ३-४ दिवस कायम राहाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही कायम आहे. राज्यात पावसाचा कहर, 104 जणांचा मृत्यू तर 189 प्राणी दगावले, गोदावरी-प्राणहीता नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे (Schools, Colleges to be closed Today in Wardha due to Flood Situation). जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नागरिकांनाही कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केलं गेलं आहे. 4, 5 दिवस पावसाचा जोर कायम राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
  पावसामुळे आतापर्यंत १०४ नागरिकांचा मृत्यू राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमशान घातले आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Rain flood, Wardha

  पुढील बातम्या