मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Har Ghar Tiranga: कमी किमतीत मिळेल मोठा 'तिरंगा'; पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वजाची विक्री सुरू, पाहा VIDEO

Har Ghar Tiranga: कमी किमतीत मिळेल मोठा 'तिरंगा'; पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वजाची विक्री सुरू, पाहा VIDEO

पोस्टाच्या पोर्टलवरून सरकारमान्य अधिकृत तिरंगा खरेदी करता येणार आहे. हा तिरंगा आपण देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान विशेष स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यासाठी स्वतःच्या घरात फडकवू शकाल.

वर्धा, 08 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान देशभरात हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) उपक्रम राबविला जाणार आहे . स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा व क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी  सरकारी पोस्ट ऑफिसमधून झेंड्याची विक्री सुरू झाली आहे. 27 बाय 18 इंच आकाराचा झेंडा 25 रूपयांत पोस्ट कार्यालयात उपलब्ध झाला आहे.  यंदा तिरंगा पोस्टाच्या पोर्टलवरून ऑनलाईन देखील खरेदी करता येणार आहे. (Independence Day 2022) जिल्ह्यातील 26 उप पोस्ट कार्यालये व 156 शाखा कार्यालयात झेंड्यांची विक्री सुरू झाली आहे. या ठिकाणी 25 रुपयांत झेंडा विकला जात आहे. 27 बाय 18 इंच असा या झेंड्याची आकार आहे. आतापर्यंत 6 हजार ध्वजांची विक्री झाली आहे. पोस्ट ऑफिसमधून किंवा पोस्टमनद्वारे देखील झेंड्याच्या खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 26 उप पोस्ट ऑफिस आणि 156 शाखा पोस्ट ऑफिसमध्ये झेंडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती डाकघर अधीक्षक एम श्रीनिवास मूर्ती यांनी दिली आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO ऑनलाईन देखील खरेदी तिरंगा पोस्टाच्या https://www.epostoffice.gov.in  या पोर्टलवरून ऑनलाईन देखील खरेदी करता येणार आहे. पोस्टाच्या पोर्टलवरून सरकारमान्य अधिकृत तिरंगा खरेदी करता येणार आहे. हा तिरंगा आपण देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान विशेष स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यासाठी स्वतःच्या घरात फडकवू शकाल. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी तीन लाख ध्वजांची निर्मिती महिला बचत गट देखील झेंड्याची निर्मिती करीत आहेत. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत महिला बचत गटांनी तीन लाख ध्वजांची निर्मिती केली असून याची विक्री देखील सुरू झाली आहे, अशी माहिती वर्धीनी महिला बचत गटाच्या सहाय्यक संगीता गायकवाड यांनी दिली.
First published:

Tags: Wardha, Wardha news

पुढील बातम्या