मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घराच्या गरिबीतही ढळला नाही विश्वास, 'केज्या'चे कसे झाले संत केजाजी महाराज? पाहा Video

घराच्या गरिबीतही ढळला नाही विश्वास, 'केज्या'चे कसे झाले संत केजाजी महाराज? पाहा Video

X
बालपणी

बालपणी महाराजांना सर्वजण ‘केज्या’ म्हणून हाक मारीत. बालपणापासूनच केजाजी अध्यात्मवृत्तीचे होते.

बालपणी महाराजांना सर्वजण ‘केज्या’ म्हणून हाक मारीत. बालपणापासूनच केजाजी अध्यात्मवृत्तीचे होते.

 • Local18
 • Last Updated :
 • Wardha, India

  वर्धा, 16 जानेवारी : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील मातीत अनेक थोर संत होऊन गेले. विदर्भातील पिता-पुत्र संत केजाजी व संत नामदेव महाराज त्यापैकीच एक. वर्धा  येथे केकाजी महाराजांचे भव्य मंदिर असून येते अनेक धार्मिक उत्सव आयोजित होतात.

  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील कुटुंब नागपूर जिल्ह्यातील बेला येथे स्थायिक झाले आणि बेला या गावात 1843 साली महाराजांचा जन्म झाला. पण त्यांचे कुटुंब त्यांच्या बालपणीच घोराड येथे आले त्यांच्या पावन स्पर्शाने घोराड नगरी विदर्भाची पंढरी बनली. केजाजी महाराजांचे वडील सखाबुवा, आई चंपाबाई भांदककर अतिशय गरिबीचे जीवन व्यतीत करीत होते.

  केज्याचा झाला संत

  केजाजी अठराविश्व दारिद्र्यामुळे गावातील वासुदेव पाटलाकडे शेतावर नोकरी करीत होते. बालपणी महाराजांना ‘केज्या’ म्हणून हाक मारीत. बालपणापासूनच केजाजी अध्यात्मवृत्तीचे होते. ते सदैव विठ्ठल नामाचा जप करीत परमेश्वर भक्तीत तल्लीन असायचे. पण प्रारंभी त्यांची महानता कुणालाही कळली नाही.

  पाटलाकडे केजाजी नोकरी करीत असताना सर्व नोकरांना काट्याचा फास रचण्यास सांगितला. सर्व नोकर काट्याचा फास रचण्यात गुंग होते तर केजाजी हरिनामात गुंग होते. इतरांचे काम पूर्ण होत असताना केज्याने काम केले नाही, म्हणून मालक रागावेल, असे महाराजांना सांगितले. असे म्हणताच महाराज हरिनामाचा जप करीत अनवाणी पायाने काट्याच्या फासावर चढून फास रचू लागले. इतर सर्व नोकरांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला.

  ही चर्चा गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील सर्वांनी हा चमत्कार बघितला. तेव्हापासून केजाजी महाराजांचे संत रूप लोकांना कळले. त्यानंतर त्यांना कधीही काम सांगितले नाही तरी नियमित मजुरी व धान्य दिले जात होते. केजाजी महाराजांची हळूहळू प्रसिद्धी होत गेल्याने राजे रघुजी भोसले महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा रघुजीराजे यांनी द्वारकेला जाण्यासाठी केजाजींना सोबत घेतले. महाराज पहाटे उठून नित्य प्रदक्षिणा करीत असताना रघुजी राजे द्वारकाधिशांचा अभिषेक करीत होते.

  Video: 81 फोर आणि 18 सिक्स! नागपूरच्या 13 वर्षाच्या यशनं काढले 508 रन

  केजाजी महाराज फक्त धोतर घालायचे, तेच अंगावर पांघरायचे. हा कुणी वेडा असेल, या अविर्भावाने द्वारपालांनी त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही. अभिषेक सुरू असताना ब्राह्मण मंत्रोच्चारण करीत होते. श्लोकाच्या विशिष्ट ठिकाणी महाराज हरी हरी विठ्ठल विठ्ठल मोठ्याने म्हणायचे; पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. ब्राह्मणांना मात्र श्लोक म्हणताना अवघड वाटत होते.

  तेव्हापासून राजे रघुजी महाराजांचे भक्त झाले

  त्याच रात्री द्वारकाधिश कृष्णरूपात ब्राह्मणांच्या स्वप्नात गेले व रघुजी राजांच्या ताट्यातील धोतर घातलेला विशिष्ट व्यक्तीच्या उपस्थितीत अभिषेक करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अशा व्यक्तीचा शोध घेण्यात आला तर ते धोतर घातलेले केजाजी महाराज होते. केजाजी महाराजांकडून अभिषेक करण्यात आला. महाराजांनी ब्राह्मणांची चूक लक्षात आणून दिली. केजाजींनी चुकलेले श्लोक म्हणून दाखविले. तेव्हापासून राजे रघुजी हे महाराजांचे निस्सीम भक्त झाले. 

  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

  संत केजाजी महाराज महापरिनिर्वाणदिनी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरतिर्थ घोराड पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ग्राम स्वच्छता अभियान, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सात दिवस भागवत कथा ज्ञानयज्ञ, 22 जानेवारीला डोळ्यांचे पारणे फेडणारा दिंडी सोहळा, 23 ला काला दहीहंडी व महाप्रसाद होणार आहे. 

  First published:

  Tags: Famous temples, Local18, Wardha