मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : खिशात बसणारी छत्री अन् कार्टून प्रिंट असलेले रेनकोट; पावसाळी साहित्याने बाजार सजला, पाहा VIDEO

Wardha : खिशात बसणारी छत्री अन् कार्टून प्रिंट असलेले रेनकोट; पावसाळी साहित्याने बाजार सजला, पाहा VIDEO

पावसाळ्यात पावसाचा काही नेम नसतो अचानक कधीही बरसतो. नोकरी, व्यवसाय, विद्यार्थी आणि चारकरमानी यांना वेळेवर आपल्या ठिकाणी पोहोचावे लागते. मग या वेळेदरम्यान पाऊस येत असेल तर किंवा रस्त्यात अचानक पाऊस सुरू झाला तर ऐनवेळी तारांबळ होते. यासाठी पावसाळ्यात प्रत्येकजण आपल्या बचावासाठी छत्री, रेनकोट जवळ बाळगतो. पावसाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, टोप्या आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...
वर्धा, 6 जुलै ; सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यंदाही गतवर्षी प्रमाणेच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या छत्री (Umbrella), रेनकोट (raincoat) यासह इतर वस्तूंच्या विक्रीने वेग पकडला आहे. बाजारात नवीन व्हरायटी असलेल्या वस्तू दाखल झाल्या आहेत. रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, प्लॅस्टिक पेपर आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजार अगदी खिशात बसेल अशी छत्री आणि लहान मुलांसाठी कार्टुनचे रेनकोट, छत्र्या दाखल आहेत. पावसाळ्यात पावसाचा काही नेम नसतो अचानक कधीही बरसतो. नोकरी, व्यवसाय, विद्यार्थी आणि चारकरमानी यांना वेळेवर आपल्या ठिकाणी पोहोचावे लागते. मग या वेळेदरम्यान पाऊस येत असेल तर किंवा रस्त्यात अचानक पाऊस सुरू झाला तर ऐनवेळी तारांबळ होते. यासाठी पावसाळ्यात प्रत्येकजण आपल्या बचावासाठी छत्री, रेनकोट जवळ बाळगतो. पावसाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, टोप्या आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्क्यांनी किमतीही वाढल्या आहेत. रेनकोट, पावसाळी ड्रेसची स्वतंत्र दुकाने नागरिकांना खुणावत आहेत.  वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO
 पावसाळी साहित्याने बाजार सजला
शहरातील बाजारात काही दुकाने पावसाळी साहित्याने सजली आहेत. मार्केटमध्ये लहान मुलांचे आकर्षण असलेल्या रेनकोटमध्ये यंदा कार्टूनची प्रिंट असलेल्या रेनकोटची भर पडली आहे. छत्रीमध्ये ‘इअर अंब्रेला’चे आकर्षण मुलांमध्ये दिसून येत आहे. मार्केटमध्ये पावसाळी ड्रेस पाठोपाठ मागणी असते, ती छत्र्यांची. शालेय विद्यार्थी, महिला, पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या आकारातील छत्र्यांनी ग्राहक वर्ग निश्चित केला आहे. दिवसेंदिवस छत्रीच्या डिझाइनमध्ये बदल होत असून, साइज देखील कमी होत आहे. सर्वसाधारण काळ्या रंगाची मोठी देशी छत्री सर्वाना माहीत असेलच, फोल्ड करताना तिची फक्त एकच घडी व्हायची. आता मात्र, त्यात बदल होऊन तीन घडी करून अगदी खिश्यात ठेवता येईल इतका लहान आकार छत्रीचा झाला आहे. अशा लहान छत्र्याही यंदा आकर्षण आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO बाजारात थ्री फोल्ड अम्ब्रेला अन्, कार्टून रेनकोट, छत्रीची क्रेझ बाजारात नवीन ट्रेंड असलेल्या छत्र्या आणि रेनकोट दाखल झाले आहेत. यामध्ये चिमुकल्यांसाठी आकर्षक अशा कार्टून छत्र्यांचा समावेश आहे. छत्रीत आठ काडी, बारा काडी, सोळा काडी प्रमाणेही साइज ठरते. सप्तरंग आणि नव रंगातील छत्र्यांचा आकर्षक लूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. मार्केटमध्ये दाखल झालेल्या थ्री फोल्ड अम्ब्रेला 200 पासून 450 रुपयांपर्यंत आहेत. मुलांसाठी कार्टून रेनकोट लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टूनची प्रिंट असलेले रेनकोट्स देखील मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. रेनकोट्सच्या किंमती 170 पासून ते 350 रुपयांपर्यंत आहे. रेनकोट प्लॅस्टिक आ​णि कापडी (नायलॉन) या दोन प्रकारात उपलब्ध झाले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते ​यंग सिनीअर्सपर्यंत प्रत्येकाच्या साइजनुसार रेनकोट उपलब्ध झाले आहेत. प्लॅस्टिक ड्रेस 180 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर कापडी नायलॉन ड्रेसची किंमत 350 रुपयांपासून सुरू होते. टू पीस रेनकोटची मागणी मोठी आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्सेबल प्लॅस्टिक पीसला देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जेन्ट्स रेनकोटची किंमत 250 ते 900 रुपयांपर्यंत आहे. महिलांसाठी देखील खास पावसाळी जॅकेट मार्केटमध्ये दाखल झाले आहे. त्याची किंमत 240 ते 370 रुपयांपर्यंत आहे. पावसाळी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढल्याचे सद्या चित्र आहे.
First published:

Tags: Rain, Wardha news

पुढील बातम्या