मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : रेल्वे, बसस्थानकावरील पार्किंगबाबत मोठा निर्णय, हजारो प्रवाशांना मिळणार दिलासा, पाहा VIDEO

Wardha : रेल्वे, बसस्थानकावरील पार्किंगबाबत मोठा निर्णय, हजारो प्रवाशांना मिळणार दिलासा, पाहा VIDEO

रेल्वे, बस स्थानकावर पार्किंगचा शुक्ल आकारला जायचा. यात मोठा खर्च प्रवाशांना सोसावा लागत होता. मात्र, आता ही पार्किंग सुविधा निःशुल्क झाली आहे.

वर्धा, 27 जुलै : रेल्वे आणि बस स्थानकावरून अनेक चाकरमानी कामानिमित्त दररोज प्रवास करत असतात. प्रवाशी घरून आपल्या वाहनाने स्थानकांपर्यंत पोहोचतात. स्थानकावर वाहन पार्क करून रेल्वे किंवा बसने सुनिश्चित स्थळी जातात. अशा प्रवास करणारे हजारो चाकरमानी असून त्यांना रेल्वे, बस स्थानकावर पार्किंगचा शुक्ल आकारला जायचा. यात मोठा खर्च प्रवाशांना सोसावा लागत होता. मात्र, आता ही पार्किंग सुविधा निःशुल्क झाली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने चाकरमानी रेल्वेने नागपूर, चंद्रपूर, अमरावती, हिंगणघाट येथे दररोज ये-जा करतात. यातील काहीजण वर्धा मुख्य रेल्वे स्थानकावरून आणि काहीजण सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून जातात. तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, पुलगाव, देवळी, आष्टी, सेलू, कारंजा, समुद्रपूर येथे ये-जा करतात. अशा प्रवाशांची संख्या काही हजारात आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेगाडी वेळेत पकडणे आणि गाडीने वर्ध्यात पोहोचल्यावर घरी लवकर पोहचणे यास प्राधान्य असते. हे उद्दिष्ट साध्य करणे ऑटोरिक्षाने शक्य होत नाही. त्यामुळे नियमित प्रवास करणारे बहुतांश प्रवासी स्वत:च्या दुचाकीने स्थानक गाठत असतात. स्थानकावरील वाहनतळावर दुचाकी ठेवून ते प्रवासाला निघतात. येथे वाहने लावण्यासाठी शुक्ल आकारला जात होता. मासिक पासची देखील सुविधा होती. मात्र, येथील पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुक्ल आता बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विनामूल्य पार्किंग व्यवस्था चाकरमान्यांना उपलब्ध झाली आहे. हेही वाचा- एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story पार्किंगसाठी असे होते दर रेल्वे स्थानकावर कारला ३ तासांसाठी १० रुपये, स्कूटरला ३ तासांसाठी ५ रुपये, व सायकलला २ रुपये दर दररोज आकारले जात होता. तर स्कूटर पार्किंगसाठी महिन्याला १६० व सायकल पार्किंगसाठी महिन्याला ८० रुपये दर घेतला जात होता. आता या सुविधा मोफत असणार आहेत. सर्वाधिक प्रवासी नागपूरकडे जाणारे रेल्वे गाडीच्या माध्यमातून सर्वाधिक प्रवासी हे नागपूर येथे जातात तसेच अमरावती, बडनेरा येथेही जातात. त्यातील अनेकांजवळ रेल्वेची एमएसटी पास काढलेली आहे. त्यासाठी ते ३ महिन्यांचे भाडे एकाच वेळी देऊन हा पास घेत असतात. हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report निःशुल्क पार्किंगमुळे दिलासा  आता रेल्वेच्या सर्व गाड्या सुरळीत सुरू झालेल्या आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गाड़ी ठेवून अपडाऊन केले जाते. सकाळी दुचाकी ठेवून परत आल्यावर ती घेऊन घरी जाणे सोयीचे आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील पार्किंगवरच वाहन ठेवले जात आहे. सध्या कुठलेही भाडे द्यावे लागत नाही. त्यामुळे दिलासा मिळाला असल्याचे नागरिक विजय चोरमारे यांनी सांगितले.
First published:

Tags: Maharashtra News, Wardha, Wardha news

पुढील बातम्या