मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Navratri 2022: एकीकरणाचा संदेश देत 310 गावात ‘एक गाव, एक दुर्गादेवी’ Video

Navratri 2022: एकीकरणाचा संदेश देत 310 गावात ‘एक गाव, एक दुर्गादेवी’ Video

नवरात्र उत्सवाला एक वेगळेच महत्त्व असते. यावेळी उत्सव काळात बंधुभाव वाढावा, या उद्देशाने प्रशासनाकडून एक गाव, एक दुर्गा देवी स्थापने आवाहन करण्यात आले होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 26 सप्टेंबर : शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरू झाला आहे. दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वर्धा जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला एक वेगळेच महत्त्व असते. यावेळी उत्सव काळात बंधुभाव वाढावा, या उद्देशाने प्रशासनाकडून एक गाव, एक दुर्गा देवीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 310 गावात एक गाव दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे. 

तब्बल 975 ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापणा 

विदर्भातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव वधां शहरात साजरा करण्यात येतो. गतवर्षी कोरोनामुळे या उत्सावर निबंध होते. त्यामुळे शहरातील नवरात्रोत्सवाचा आनंद अनेकांना घेता आला नाही. परंतु, यावर्षी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने शहरातील मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. नवरात्रीत नऊ दिवस भक्तीमय वातावरण सर्वत्र पाहावयास मिळणार आहे. आज 26 सप्टेंबर रोजी घटनास्थापना झालेले असून दुर्गा माता नऊ दिवसांकरिता विराजमान असणार आहे. या उत्सवाची तयारी जिल्ह्यातील सर्वच मंडळांनी केली आहे. जागोजागी मंडप, मातेचा कक्ष उभारण्यात आले आहेत. 

Video : अखेर बीडमध्ये धावली रेल्वे!, काय म्हणतात सामान्य नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट

या भागात जय्यत तयारी

सराफ बाजार तसेच गोलबाजार येथे भव्य प्रवेशद्वार, आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. शहरातील कपडा लाईन, सोनार लाईन, पत्रावली चौक, पटेल चौक, किराणा लाईन, मोहता जीन परिसर, साप्ताहिक बाजार, शास्त्री चौक, कृष्णनगर, पोद्दार बागीचा परिसर, पारस फैक्ट्री चौक, आर्वी नाका, कारला चौक, शिवाजी चौक, धूनिवाले मठ, इतवारा, ठिकाणी दुर्गा मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.

Navratri : गरब्यात नाचण्यासाठी मुलंही करतायत जय्यत तयारी, पाहा VIDEO

रासगरबा, सार्वजनिक लंगरचे आयोजन

गरबा, जागरता, लंगर आदी विविध कार्यक्रमामध्ये लहानांपासून थोरांचाही समावेश असतो. दरम्यान अन्नदान केले जाते. यावर्षी अन्नदानाची तयारी दुर्गा मंडळासोबतच सामाजिक संघटना, संघटना, व्यापारी मंडळ आदींनी केली आहे. जागोजागी स्टॉल लावून खाद्य पदार्थाचे भाविकांना वितरण होणार आहे.

1950 पोलिसांचा तगडा बंदोबस्तात

नवरात्रोत्सव आनंदात साजरा होण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेकरिता उत्सवादरम्यान पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 4 डीवायएसपी, 19 एसएचओ एपीआय, पीएसआयच्या देखरेखीखाली 1250 पोलीस, 700 पुरुष, 75 महिला होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 2 प्लाटून सज्ज करण्यात आले आहेत..

First published:

Tags: Navratri, Wardha, Wardha news