मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mahavikas Aghadi : नाशिकसह 5 विधानपरिषदेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर, तांबेंची हकालपट्टी

Mahavikas Aghadi : नाशिकसह 5 विधानपरिषदेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर, तांबेंची हकालपट्टी

नाशिक पदवीधर मतदार संघासह 5 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघासह 5 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघासह 5 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 19 जानेवारी : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीची बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच वातावरण तापलेले पहायला मिळाले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघासह 5 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रीत बैठक घेत आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये सत्यजीत तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

नाशिक- शुभांगी पाटील, नागपूर- सुधाकर आडबाले, कोकण- बाळाराम पाटील, औरंगाबाद- विक्रम काळे, अशी नावे घोषीत करण्यात आली आहेत. या उमेदवारांची अधिकृत घोषणा काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदारा जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाचही जागा जिंकणार, मागच्या 5 वर्षात केंद्राने जनतेची गळचेपी केली, ज्या राज्यात आमची सत्ता आली त्या राज्यात आम्ही जुनी पेन्शन लागू केली आहे. यामुळे जनता आमच्या पाठीशी राहत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

जगात मोठा पक्ष म्हणून गवगवा करणाऱ्या भाजपला नाशिकसारख्या ठिकाणी भाजपला नेता मिळाला नाही. यासगळ्याचा विचार केला तर नाशिकसह पाचही विधानपरिषदेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार यात शंका नाही.

हे ही वाचा : पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या हात जोडून...

तसेच सुधीर तांबे यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे. याचबरोबर बाळासाहेब थोरात यांची तब्बेत खालावली आहे. ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते आल्यावर आपली भूमिका मांडतील असे पटोले म्हणाले.

गिरीश महाजन म्हणतात

 काँग्रेस आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीची मोठी अडचण आहे. सत्यजीत तांबे यांनी मी पाठिंबा मागण्यासाठी भाजपकडेही जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या बंडाला भाजपची फूस असल्याचेही बोलले जात आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "सत्यजित तांबे सहज निवडून येतील पण भाजपचा पाठिंबा घेतला तर.." असं वक्तव्य महाजन यांनी केल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

First published:

Tags: Aurangabad, Maharashtra political news, Nagpur, Nashik