मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : यंदा सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस: सर्वच जलाशय ओव्हरफ्लो, VIDEO

Wardha : यंदा सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस: सर्वच जलाशय ओव्हरफ्लो, VIDEO

जुलैनंतर ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच जलाशयाची पाणीपातळी वाढली असून जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहेत.

    वर्धा, 15 ऑगस्ट : जिल्ह्यात संततधार पावसाने (Rain) सर्वांचाच ताण वाढवला आहे, दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सोमवार आणि मंगळवारी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 121.1 टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली असून यंदा सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट पाऊस झाला आहे.  (Wardha rain update) जुलैनंतर ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच जलाशयाची पाणीपातळी वाढली असून जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहेत, परिणामी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. नदीवरील काही पुलांवरून सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाण्याखाली गेलेले पूल आणि धोक्याचे रस्ते नागरिकांनी जीव धोक्यात घालून ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई ऑगस्टमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. यावेळी होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडत आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. पुरामुळे शेकडो कुटुंबे बाधित झाले होते. लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली, अनेक कन्व्हर्ट आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली. यासह अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला होता. यंदा तिप्पट पाऊस जिल्ह्यात जुलैपासून सतत पाऊस सुरू आहे. मागील १० वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत यंदा तिप्पट पाऊस झाला आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता शंतनू दातेराव यांनी दिली. सर्व जलाशय ओव्हरफ्लो जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व जलसाठे ओसंडून वाहत आहेत. धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा, डोंगरगाव, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, लाल नाला, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.  हेही वाचा- शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई याशिवाय कवडी, सावंगी, लहादेवी, पारगोठण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंदी, कुऱ्हा, रोठा-1, रोठा-2, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी , टाकळी बोरखेडी हा छोटा प्रकल्पही 100 टक्के भरले आहेत. हे रस्ते वाहतुकीसाठी बंद पुलगाव विटाळा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाणी जातं आहे. धनोडी व अमरावती रस्त्यावरनं पाणी जातं असल्याने हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. सततच्या पावसाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी लोकांना नदी पात्रात जाणे टाळावे, काम नसेल तर घराबाहेर पडू नये, धोक्याचे रस्ते, पूल, ओढे, नद्या ओलांडू नये असे आवाहन उपविभाग अभियंता पवन पांढरे यांनी केले आहे. तहसीलनिहाय टक्केवारी  आर्वी- 104.1 %, कारंजा 148.8 %, आष्टी 122.3 %, वर्धा 129.4 %, सेलू  114.0 %, देवली 118.3, %, हिंगणघाट 123.2 %, समुद्रपूर 137.2 %,
    First published:

    Tags: Rain, Wardha, Wardha news, संततधार पाऊस

    पुढील बातम्या