अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा, 22 मे: विविध खेळ प्रकारांकडे आजकाल चिमुकल्यांचा कल वाढताना दिसून येतो आहे. वर्धा जिल्ह्यातही मोठ्या संख्येने मुलं आणि मुलीही कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. सध्या पालकांनाही आपल्या मुलांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे अगदी 5-6 वर्षांचे चिमुकलेही कराटे प्रशिक्षण घेत आहेत. अनेक मुलं कराटेमध्ये राज्य ते राष्ट्रीय पातळीपर्यंत बक्षीस मिळवत आहेत. कराटे क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर विशेष मेहनत घेणे गरजेचे आहे. मोबाईलच्या आहारी जाऊ नये आणि सकस आहार घ्यावा, असे आवाहन वर्ध्यातील प्रशिक्षकांकडून आणि यशस्वी कराटे खेळाडूंकडून करण्यात येते.
मुलींना कराटे शिकण्याचे अनेक फायदे
वर्धा जिल्ह्यात कराटे शिकणाऱ्या चिमुकल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुली देखील अतिशय उत्साहाने कराटे प्रशिक्षण घेत आहेत. मुलींना स्वतःची रक्षा करण्यासाठी कराटे प्रशिक्षण उपयोगी ठरते. आज-काल सर्वच क्षेत्रांमध्ये मुलींची संख्या वाढताना दिसते आहे. इतर खेळ प्रकारांसह कराटे आणि लाठीकाठी मध्ये देखील अनेक मुलींनी राज्यस्तरीय आणि तर ही बक्षीसे मेडल्स जिंकली आहेत.
कराटे चॅम्पियन बनण्यासाठी हे नियम पाळा
कराटे शिकत असताना किंवा कराटीचे प्रशिक्षण घेत असताना प्रत्येकाला कराटे चॅम्पियन बनण्याची इच्छा असते. मात्र कराटे चॅम्पियन होण्याकरिता काही नियम पाळणे आणि काही गोष्टी टाळणेही गरजेचे आहे, असे मार्गदर्शक सांगतात. मुलांनी आपल्या ध्येयावर कायम राहावं. मोबाईलचे गेम खेळण्याची सवय स्वतःला लावून घेऊ नये. तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील कराटे प्रशिक्षण घेणाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत विठ्ठलनामात चिमुरडे दंग, मृदुंगाच्या साथीनं करतायत हरीनामाचा गजर, Video
मुलांचा सर्वांगीण विकास गरजेचा
मुलांना शिक्षणासोबतच एखाद्या खेळांतही नैपुण्य असणं गरजेचं असतं. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी खेळ, छंद उपयुक्त ठरतात. त्यामुळं पालक वर्गाचा सध्या उन्हाळा सुट्टीत मुलांना खेळ, संगीत, कला शिकवण्याकडे कल असतो. तसेच कराटे सारख्या खेळामुळे स्वसंरक्षणाचे धडे मिळतात तसेच शरीरही पिळदार बनते. त्यामुळे कराटे शिकण्यालाला अनेकजण प्राधान्य देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Life18, Local18, Sports, Wardha, Wardha news