मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : पोस्ट विभागाच्या योजना लय भारी, गुंतवणुकीत झाली 30 टक्क्यांनी वाढ

Video : पोस्ट विभागाच्या योजना लय भारी, गुंतवणुकीत झाली 30 टक्क्यांनी वाढ

कोरोना काळापासूनच बचत खाते गुंतवणुकीसाठी नागरिकांनी पोस्टाला पसंती दिली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 23 नोव्हेंबर : टपाल विभागातील गुंतवणुकीचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक योजना, सुकन्या समृद्धी योजना, आणि बचत योजनांमुळे पोस्टातील गुंतवणुकीला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना काळापासूनच बचत खाते गुंतवणुकीसाठी नागरिकांनी पोस्टाला पसंती दिली आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत गुंतवणूकदारांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

गुंतवणुकीवर मिळणारे चांगले व्याज आणि गुंतवलेले पैसे सुरक्षित राहण्याची खात्री पोस्टाची असते. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी गुंतवणुकीसाठी पोस्टाला पसंती दिली आहे. एप्रिलपासून सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे 28 हजार नागरिकांनी विविध योजनांत गुंतवणूक केली आहे. जिल्ह्यातील 26 पोस्ट कार्यालयात पोस्टाच्या विविध योजनांचा जवळपास 28 हजार 17 लोकांनी लाभ घेत गुंतवणूक केली आहे. कोरोना काळापासूनच बचत खाते गुंतवणुकीसाठी नागरिकांनी पोस्टाला पसंती दिली आहे. ज्येष्ठाच्या खात्यामध्ये 496 तर बचत खात्यात 8577 जणांच्या ठेवी केल्या आहे.

चिंता मिटली! आता वर्षातून 4 वेळा करता येणार मतदान नोंदणी

गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये बचत खाते - 8577, आवर्ती खाते- 8467, मासिक आय योजना - 977, ज्येष्ठ नागरिक योजना - 496, सावधी जमा -6510, पीपीएफ योजना - 242 सुकन्या समृद्धी योजना - 1447, राष्ट्रीय. बचत खाते - 753, किसान विकास खाते - 548 एवढ्याचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य पोस्ट मास्तर अविनाश अवचट यांनी केले आहे. 

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला 

व्याजदर जास्त असल्याने तसेच गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहण्याची खात्री असल्याने पोस्टात सर्वसामान्यांपासून श्रीमंत नागरिकांपर्यंत गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. जिल्ह्यातील 26 पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत गुंतवणूकदारांमध्ये 30 टक्के वाढ झाल्याची माहिती अविनाश अवचट, मुख्य पोस्ट मास्तर, जिल्हा पोस्ट कार्यालय यांनी दिली आहे.

First published:

Tags: Local18, Wardha